Rupali Chakankar: राजीनाम्यानंतर चाकणकरांनी व्यक्त केली मनातली खदखद! म्हणाल्या, त्या सर्वांना...

Rupali Chakankar: स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
Rupali Chakankar
Rupali Chakankar
Published on
Updated on

Rupali Chakankar: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडं आपला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली, तसंच आपल्याविरोधात ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली, प्रकाशित केली, त्यांना कादेशीर नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर यानंतर सविस्तर पत्रकार परिषद घेत आपण आपली भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Rupali Chakankar
Sangli News: "एका लुगड्याने बाई म्हातारी होतं नाही"; चंद्रकांत पालकांकडून अस्सल गावराण म्हणीद्वारे सांगलीतील पराभवाचं विश्लेषण

देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांच्याकडं राजीनामा सोपवल्यानंतर बाहेर येताच रुपाली चाकणकर यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला. स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु असलेल्या अशोक खरात याच्याशी संबंधित संस्थेच्या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानं टार्गेट झाल्यानं आणि त्याची परिणीती राजीनाम्यात झाल्यानं चाकणकर या माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तणावग्रस्त वाटत होत्या. आपल्यावरील आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्नही त्यांनी यावेळी केला. यासाठी त्यांनी पुराव्यांसाठी काही कागदही सोबत आणले होते. यामध्ये त्यांनी खरात पती-पत्नीला माझ्या कुटुंबानं गुरु मानल्याचं त्यांनी मान्य केलं. तसंच त्यांच्या धार्मिक संस्थेच्या विश्वस्तपदी आपण असल्याचंही आपण सुरुवातीलाच स्पष्ट केल्याचा पुनरुच्चार केला.

Rupali Chakankar
Top 10 News: एका फिर्यादीनं रातोरात सूत्र फिरलं, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना...ते रुपाली चाकणकर यांची अखेर गच्छंती? तात्काळ राजीनाम्याचे फडणवीसांचे आदेश

दरम्यान, गुरुपौर्णिमेनिमित्त खरात पती-पत्नीचं आम्ही पाद्यपुजन केलं हे ही खरं होतं. पण त्यावेळी तिथं इतरही अनेकांनी पाद्यपुजनं केलं होतं. पण केवळ आमचाच निवडक फोटो पसरवला गेला. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असल्यानं शालेय विद्यार्थ्यांना काही वस्तू वाटपासाठी म्हणून आपण खरातांच्या संस्थेत गेल्याचे फोटो आणि तिथलं भाषण व्हायरल केलं गेलं. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बोटाला झालेल्या जखमेमबाबतची फोटोच्या स्क्रीनशॉटवरची १२ तारीख खोडून ती २ तारीख असल्याचं पसरवलं गेलं. खरात कुटुंबाशी आपला आध्यात्मिक संबंध असला तरी काही वर्षांपूर्वीचे हे फोटो आहेत. त्यावेळी आम्हाला त्यांच्या या घाणेरड्या कृत्यांबाबत काहीही माहिती नव्हती. त्यामुळं आमचा या प्रकरणांशी काहीही संबंध नाही, असं यावेळी चाकणकरांनी सांगितलं.

Rupali Chakankar
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर अन् पोलीस महासंचालकांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

त्याचबरोबर स्थानिक पत्रकाराचा मुद्दा उपस्थित करत त्यानं दिलेल्या बातमीची दखल घेऊन त्यांना अधिकचे पुरावे द्यायला महिला आयोगानं सांगितलं होतं. त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासनालाही तात्काळ या बातमीची दखल घेण्याचे निर्देश दिल्याचंही चाकणकरांनी सांगितलं. त्याचबरोबर या पोलिसांनी ही बातमी ऐकीव माहितीवर दिली असून आमच्याकडं यासंदर्भात कुठल्याही महिलेची तक्रार आलेली नाही, असा अहवाल दिल्यानं महिला आयोगानं संबंधित वर्तमानपत्राला याबाबत तसं लेखी पत्र दिल्याचं यावेळी रुपाली चाकणकरांनी स्पष्ट केलं. आपली बाजू मांडताना त्या काहीशा भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच आपल्याबाबत ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यानंतर त्यांनी आपण या सर्व प्रकरणाबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर करत तात्काळ तिथून निघून गेल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com