Sadabhau Khot, Devendra Fadanvis sarkarnama
महाराष्ट्र

Sadabhau Khot News : सदाभाऊ खोतांचा घरचा आहेर; म्हणाले, आयारामांचे लाड किती दिवस पुरविणार ?

Sachin Waghmare

Lok Sabha Election News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी राज्यातील राजकीय वातावरण अजूनही तापलेले आहेच. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत महायुती बॅकफुटावर आली असताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीला घरचा आहेर देत घेरले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील घटक पक्षाला संधी द्यावी, असा सल्ला खोत यांनी दिला.

महायुती (Mahayuti) सरकारने गेल्या अनेक दिवसापासून मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घटक पक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात योग्य स्थान मिळाले पाहिजे, अन्यथा नाराजी पसरेल हे करीत असताना आयाराम गयारामांचे किती लाड पुरवायचे, याचा अंदाज आला असेल, असे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सलग तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. तर या मोदी 3.0 कॅबिनेटचे अधिकृतपणे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मोदींच्या कॅबिनेटच्या शपथविधीला एक दिवस होत नाही तर काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे पाहायला मिळत असतानाच रयत क्रांती संघटनेची माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी लावून धरली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात गावाकडच्या नेतृत्व करणाऱ्या घटक पक्षांचे प्रतिबिंब मंत्रिमंडळात विस्तारात उमटलं पाहिजे आणि घटक पक्षांना सन्मान दिला पाहिजे, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये नाराजीची भावना पसरेल, असं सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपला (Bjp) दिला आहे.

त्यासोबतच येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तार करताना इतर पक्षांतून येणाऱ्या आयाराम-गयारामांचे लाड किती पुरवावे, याला निर्बंध असणे गरजेचे आहे, असा सल्ला देखील सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT