Sambhaji bhide on sambhajiraje chhatrapati (1).jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Sambhaji Bhide: भिडे गुरुजींनी संभाजीराजेंचा दावाच ठरवला खोटा; म्हणाले, 'रायगडावरील वाघ्या कुत्र्या'ची कथा...

Waghya Dog Statue On Raigad Fort Controversy : संभाजीराजे यांनी काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी उचलून धरली आहे.

Deepak Kulkarni

Sangli News : माजी खासदार व स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी रायगड किल्ल्यावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे.त्याला ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे.एकीकडे वाघ्या कुत्र्यावरुनन नवा वाद पेटला असतानाच दुसरीकडे आपल्या रोखठोक विधानांमुळे वादाच्या भोवर्‍यात अडचणीत येणार्‍या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी संभाजीराजेंचा दावाच खोटा ठरवला आहे.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगलीत बुधवारी(ता.26) माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी कुणाल कामरावरुन होत राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि विधिमंडळातील सत्ताधारी विरोधकांच्या गोंधळावर कठोर शब्दांत टीका केली. याचवेळी त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन पेटलेल्या वादावरही रोखठोक भाष्य केलं.

संभाजी भिडे म्हणाले,रायगडवरच्या वाघ्या कुत्र्याची कथा ही सत्य आहे.संभाजीराजे भोसले जे बोलतात, ते चूक आहे. वाघ्या कुत्र्याची कथा सत्य आहे.वाघ्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली होती.त्या काळी माणसे एकनिष्ठ नव्हती, तेवढी एकनिष्ठ कुत्री होती, हे दाखवण्यासाठी हा पुतळा आवश्यक असल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी उचलून धरली आहे.तसेच त्यांनी हा पुतळा 31 मेपर्यंत राज्य सरकारने काढावा अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कुणाल कामरा वादावर काय म्हणाले..?

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंवर केलेल्या वादग्रस्त गाण्यामुळे स्टॅडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिवसैनिक पेटून उठले आहेत.त्याचवेळी कामरावरुन विधिमंडळाच्या अधिवेशनातही वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. याचवेळी आता संभाजी भिडेंनी कामरासह सत्ताधारी -विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.

ते म्हणाले,कुणाल कामराकडून जो नादानपणा सुरू आहे आणि त्यावरून विधानसभेत जो धुडगूस सुरू आहे तो काही लोकसभेला शोभणारा नाही.मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही,पण ज्यांनी ज्यांनी हा नीचपणा केलाय, ते सगळे देशद्रोही आहेत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT