sambhaji brigade Manoj Jarange Patil Uaddhav Thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Sambhaji Brigade : अडीच वर्षांची युती तुटली? ऐन निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ठाकरेंची साथ सोडून जरांगेंसोबत जाणार?

Sambhaji Brigade News : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युतीमध्ये असलेल्या संभाजी ब्रिगेडने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 50 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी अद्यापही सुरू आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर युतीमध्ये असलेल्या संभाजी ब्रिगेडने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 50 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि संभाजी ब्रिगेड यांची युती आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडकडून शिवसेनेकडे काही जागांची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडला उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभेच्या पाच जागा हव्या आहेत. यामध्ये चिखली, हिंगोली व नांदेड उत्तरच्या जागांचा समावेश आहे. चिखलीतून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी माजी आमदार रेखा खेडेकर, हिंगोलीतून संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष मनोज आखरे इच्छूक असल्याचं समोर आलं आहे. मात्र या जागांवरती संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये एकमत होताना दिसत नाहीये त्यामुळे कुठेतरी संभाजी ब्रिगेड आता वेगळा विचार करण्याच्या मनस्थितीत असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे संभाजी ब्रिगेडकडून (sambhaji brigade) 50 उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबतची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबतची असलेली संभाजी ब्रिगेडची युती तुटणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. गेले अडीच वर्ष संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची (Shivsena UBT) युती होती. मात्र विधानसभेत अपेक्षित जागा मिळत नसल्याने आता संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे याबाबत भूमिका जाहीर करणार आहेत.

दरम्यान हा शिवसेना ठाकरे पक्षाला एक मोठा धक्का मानला जात असून संभाजी ब्रिगेडचा एक शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड आणि जरांगे (Manoj Jarange) बरोबर जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT