Deepak Mankar: मराठा समाजाचा पुण्यातील पहिला उमेदवार ठरला? राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाचे नाव निश्चित

Deepak Mankar for Khadakwasla Assembly election: पुण्यातून मराठा समाजाचा उमेदवार देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव मंजूर केला आहे.
Ajit Pawar - Deepak Mankar
Ajit Pawar - Deepak MankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: विधानसभा निवडणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पुण्यामधील झालेल्या बैठकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आलं आहे.

खडकवासल्यातून मराठा क्रांती मोर्चातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सध्या या मतदारसंघातून मनसेने दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्याप खडकवासल्याच्या जागेवर एकमत झालेले नाही. यामुळे युती आणि आघाडीचा उमेदवार ठरला नसतानाच आता मराठा समाजाने या मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.

पुण्यातून मराठा समाजाचा उमेदवार देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव एक मताने मंजूर केला आहे.

Ajit Pawar - Deepak Mankar
Mayuresh Wanjale: पुण्यातील मनसेचे पहिले आमदार, 'गोल्ड मॅन'च्या सुपुत्राची राजकारणात एन्ट्री; खडकवासल्यात आघाडी अन् महायुतीचे टेन्शन वाढलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले दीपक मानकर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जाते.दीपक मानकर यांना राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेची आमदारकी हवी होती. मात्र आमदारकी न मिळाल्याने त्यांनी थेट राजीनामाचा पवित्रा घेतला होता. यानंतर अजित पवारांनी त्यांची समजूत काढली.

त्यानंतर दीपक मानकर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. मात्र आता मराठा समाजाने खडकवासल्यातून त्यांच्या उमेदवारी बाबतचा ठराव मंजूर केल्याने आता याबाबत दीपक मानकर नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com