Ajit Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Sameer Bhujbal Video : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सर्वात मोठी बातमी! अजितदादांना 'दे धक्का', तोही भुजबळांकडून..!

Sameer Bhujbal resigns NCP ajit Pawar : अजित पवार यांचे विश्वासू सहकारी छगन भुजबळ यांच्या परिवारातून अजित पवारांना मोठा धक्का देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुक लढण्यासाठी भुजबळांच्या कुटुंबातील सदस्याकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

Roshan More

Sameer Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी अखेर आपला पत्ता बाहेर काढत विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. समीर भुजबळ यांनी आपल्या पदाचा राजीनाम देत नांदगाव विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. समीर भुजबळ हे छगन भुजबळांचे पुतणे आहेत. त्यामुळे आणखी एका पुतण्याने बंडाचा झेंडा फडकावल्याची चर्चा आहे.

समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

समीर भुजबळ हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. नांदगाव विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, ही महायुतीमधये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला सुटली. एकनाथ शिंदे यांनी येथून सुहास कांदेंना उमेदवारी दिली.

त्यानंतर समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश न करता समीर भुजबळ यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुतीमध्ये सुहास कांदे यांना नांदगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक सोपी जाईल, अशी चर्चा होती. मात्र, समीर भुजबळ यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी खासदार भुजबळ यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातील सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता चुरशीची झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT