Manoj Jarange Patil Video : 'इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार', मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

Death threat to Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यास सुरवात केली आहे. तब्बल 23 जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती जरांगे पाटील घेणार आहेत.
 Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी पाडण्याचे तर काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होत आहे.

जरांगे पाटील हे इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती घेत आहेत. मात्र, 'इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार', अशी धमकी मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

यूट्यूबच्या कमेंटमध्ये फेक अकाऊंटवरून मनोज जरांगे पाटील यांना ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंट वरून मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या धमकींना पोलिस सावध झाले आहेत.

 Manoj Jarange Patil
Parbhani Assembly Constituency 2024 : शिवसेनेचे राहुल पाटील `मशाल` घेऊन सज्ज !विरोधात धनुष्यबाण- घड्याळ की कमळ ?

उमेदवारी अर्ज दाखल करा

मनोज जरांगे पाटील यांनी मतदारसंघातून एक किंवा दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल करा जास्त लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यास लगेच उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे.

मराठवाड्याचे समीकरण जरांगे ठरवणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सर्वाधिका फटका भाजपला मराठवाड्यात बसला होता. मराठा आरक्षणाला मराठवाड्यातून सर्वाधिक पाठींबा मिळतो आहे.त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात मनोज जरांगे काय भूमिका घेतात यावर मराठवाड्यातील निवडणुकीचे समीकरण अवलंबून असेल.

 Manoj Jarange Patil
Ajit Pawar NCP News : ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा दिलासा; पण, अजितदादांना 'हा' मजकूर लिहावा लागणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com