Ram Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Ram Shinde : आमदाराने 5 वेळा फोन करुनही उचलला नाही; दिव्यांग आयुक्तांवर कारवाईसाठी सभापती राम शिंदेंचे आदेश

Sandip Joshi Ram Shinde Pravin Puri : आमदार जोशी यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करताना शोभाताई भाकरे शाळेत 38 विद्यार्थी मतीमंद आहेत.तेथे भोजनाची व्यवस्था वाईट आहे. विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या जातात.संस्थाचालक हा बंदूकीचा धाक दाखवतो.

Roshan More

Sandip Joshi News : नागपूरमधील शोभाताई भाकरे मतिमंद मुलांच्या शाळेच्या समस्यांचाबाबत आमदार संदीप जोशी यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला, संस्थाचालक शिक्षण आणि मुलांना धमकवतात. बंदुकीचा धाक दाखवून आपल्या विरोधात तक्रार करू नका, असे सांगतात. या संवेदनशील मुद्यावर दिव्यांग आयुक्तांकडून दखल घेतली जात नाही. आपण सहावेळा फोन केला मात्र त्यांनी उचलला नाही, असे जोशी म्हणाले.

जोशी यांच्या प्रश्नानंतर विधान परिषदेतील आमदार आक्रमक झाले. आमदाराला अशी वागणूक मिळत असेल तर आयुक्तांना निलंबित करावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. जोशी यांनी देखील या संदर्भात आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करणार का असा प्रश्न विचारला. मंत्री अतुल सावे यांनी IAS दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करणे हे माझ्या अखतिरत्या येत नाही, असे सांगितले.

सभागृहात आमदार आक्रमक झाल्यानंतर सभापती राम शिंदे म्हणाले, भावना अतिशय तीव्र आहे. मंत्री महोदय तुम्ही वस्तुस्थिती मान्य केली. त्यामुळे त्यांना रजेवर पाठवून शासनाच्या मार्फत निलंबनाची कारवाई करण्यात यावी. त्यानंतर सभापतींच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले. त्यामुळे दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांची अडचण वाढणार आहे.

संस्थाचालकावर गुन्हा दाखल होणार

आमदार जोशी यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करताना शोभाताई भाकरे शाळेत 38 विद्यार्थी मतीमंद आहेत.तेथे भोजनाची व्यवस्था वाईट आहे. विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या जातात.संस्थाचालक हा बंदूकीचा धाक दाखवतो. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात यावा. संस्थेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी केली. त्यावर मंत्री सावे यांनी संस्थेवर प्रशासक नेमला आहे. प्रशासक चौकशी करून गुन्हा दाखल करेल असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT