Uddhav Thackeray Politics : राज ठाकरे गाजवून गेले, आता उद्धव ठाकरे गाजवणार नाशिकचं मैदान

Uddhav Thackeray to visit Nashik after Raj Thackeray's tour : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत.
Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj Thackeray
Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन दिवसीय अधिवेशन नाशिकच्या इगतपुरीत नुकतेच पार पडले. या अधिवेशनात राज्यभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी धडे दिले. मनसेने निवडणुकीतील रणशिंगच या शिबीरातून फुंकले आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मनपा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान आता राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे सुद्दा नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. जुलै च्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे दोन दिवस नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व्यूहरचना आखली जाणार आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी शिबीरात पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीसंदर्भातील कोणताही निर्णय घेतला गेला नसला तरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मात्र उद्धवसेनेसोबत युतीकडे कल आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे आपल्या पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

पालिका निवडणुक तोंडावर असताना ठाकरेंच्या पक्षाला नाशिकमध्ये मोठी गळती लागलेली आहे. पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजप व शिवसेनेची(शिंदे गट) वाट धरलेली आहे. नाशिकमध्ये संघटनेत प्रमुख पदावर असलेले सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुनील बागूल व मामा राजवाडे भाजपच्या वाटेवर आहेत. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह अर्धा डझन माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यापूर्वीही उद्धव ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाने गळाला लावले आहेत. त्यामुळे पक्षापुढे अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत.

Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj Thackeray
Raj Thackeray Tribal Protest: आदिवासी विकास भवनला आंदोलकांचा घेरा... बिऱ्हाड मोर्चेकरी संतापले, आता प्रश्न राज ठाकरेंच्या दरबारात!

त्यामुळे उद्धव ठाकरे स्वत:नाशिकमध्ये येणार असून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने नाशिक जिल्ह्यात भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना उबाठा गटाच्या शालीमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडून गेलेल्या नेत्यांवर टीका करत चांगलेच तोंड सुख घेतले.

Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray and MNS Chief Raj Thackeray
Chandrakant Raghuwanshi Politics: नंदुरबारच्या राजकारणात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा नवा डाव, थेट देवेंद्र फडणवीस यांनाच घातले साकडे?

मामा राजवाडे यांच्या जागेवर आता प्रथमेश गिते यांची उबाठाच्या महानगप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. परंतु बाहेर पडलेल्यांनी माझ्या मुलालाही फोडण्याचा प्रयत्न केला असं वसंत गिते म्हणाले. यावेळी माजी महापौर विनायक पांडे म्हणाले की, विधानसभेत आपल्याला पक्षाकडून तिकिट दिले जाण्याची शक्यता असतांना सुनील बागुल आणि बबनराव घोलप यांनी आपल्याला उमेदवारी मिळू नये याकरीता अडचणी निर्माण केल्या. आपण महापौर असतांना स्थानिकांचे ऐकत नसल्याबाबत चुकीचे संदेश मातोश्रीवर पोहोचवण्यात आल्याचे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com