Sagli Corporation Sarkarnama
महाराष्ट्र

सांगलीत मध्यरात्री राजकीय उलथापालथ : 15 माजी नगरसेवक अजितदादांना भेटले; शरद पवार, काँग्रेस, भाजपला मोठा धक्का

Sangli Mahanagarpalika Election News update: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे या यावेळी उपस्थित होते. लवकर हे 15 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

Mangesh Mahale

Sangli Mahanagarpalika Election: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी सोमवारी एकत्रित पत्रकार परिषद घेत सांगली महापालिकेसाठी युती करणार असल्याची घोषणा केली आहे. याला काही तास झाले असतानाच सांगली, मिरज, कुपवाडा येथील पंधराहून अधिक माजी नगरसेवकांनी काल (सोमवारी) पु्ण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे या यावेळी उपस्थित होते. लवकर हे 15 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

अजितदादा यांच्या भेटीत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच हा पक्षप्रवेश मिरजेत होणार आहे. पंधरा माजी नगरसेवक हे भाजप, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबधीत मधील आहेत. राष्ट्रवादीच्या माजी महापौरासह काही बड्या नगरसेवकांचाही यात समावेश आहे.

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकीत महायुतीत लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसरीकडे सोमवारी जयंत पाटलांनी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थिती सांगली महापालिका युती करणार असल्याचे जाहीर केले आहे.

अशातच आता या पंधरा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवश केला तर काँग्रेससह शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजपला ही निवडणूक जड जाणार आहे. सांगलीत अजितदादांची ताकद वाढली तर मिरजेत जयंत पाटील, विशाल पाटील आणि भाजप या निवडणुकीस कस लागेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मिरज शहरात महापालिकेच्या २७ जागा आहेत.

अजित पवार यांची भेट घेणार माजी नगरसेवक

  • राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर- मैनुद्दीन बागवान, आरिफ चौधरी, चंद्रकांत हुलवान, नर्गिस सय्यद, आजम काझी, रमजान सतारमेकर, अंकुश कोळेकर,

  • मिरजेचे माजी महापौर- किशोर जामदार

  • काँग्रेसचे माजी नगरसेवक- करण जामदार,

  • भाजपचे शिवाजी दुर्वे,

  • जनसुराज्यचे आनंदा देवमाने, संतोष कोळी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT