Devendra Fadnavis on Sanjay Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis on Sanjay Patil : पत्रकारांना मारून टाकेल..! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या धमकीवर देवाभाऊ संतापले; 'खाकी'तून उत्तर देण्याची तयारी!

Sanjay Patil threat journalists sparks massive controversy Devendra Fadnavis and Eknath Shinde react strongly : एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनाच थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

Pradeep Pendhare

Sanjay Patil Threatens Journalists : राज्यातील राजकारणात सध्या नेत्यांच्या भाषेचा स्तर किती खालावला आहे, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. संजय पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनाच थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena UBT) सोडून नुकतेच एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये दाखल झालेले खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर अत्यंत कठोर भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला. आम्ही कोणाचेही घर बॉम्बने उडू देणार नाही. अशा पोकळ धमक्यांना कोणी घाबरण्याचे कारण नाही. कोणी धमक्या देत असेल, तर पोलिस त्याला योग्य उत्तर देतील, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

या घटनेचे पडसाद थेट विधिमंडळातही उमटले. विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल करत हा मुद्दा उचलून धरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकारांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, संजय पाटील यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले असून, मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरून एकनाथ शिंदे शिवसेनेवर जोरदार टीका केली. हे आता लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीत, तर मिंधे प्रतिनिधी झाले आहेत. शिवीगाळ, धमक्या आणि दादागिरी हा त्यांचा नवा चेहरा आहे. हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संजय दिना पाटील माध्यम प्रतिनिधींवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पत्रकारांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर वारंवार प्रश्न विचारल्याने ते संतापल्याचे दिसते.

व्हिडिओमध्ये ऐकू येतं आहे

आता परत विचारायला आलात तर थेट मारून पाठवेन… जा पोलिस कमिशनरकडे, तक्रार करा… खूप दिवस मी सहन केलंय! या वक्तव्यानंतर पत्रकार संघटनांसह विरोधकांनी संताप व्यक्त केला असून, महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT