Tukaram Mundhe FDA Raid : तुकाराम मुंढेंची शिर्डीत पुन्हा धडक! 'चिरंजीव पेढा' FDAच्या हिट लिस्टवर? 700 किलो पेढे जप्त; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ, अनेकांनी दुकानेच बंद ठेवली

FDA team led IAS Tukaram Mundhe cracks down Shirdi, seizes over 700 kg pedha stock amid food safety concerns : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहिल्यानगर कार्यालयातील पथकाने शिर्डीत पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तब्बल 700 किलोहून अधिक पेढ्यांचा साठा जप्त केला.
Tukaram Mundhe action Shirdi pedha
Tukaram Mundhe action Shirdi pedhaSarkarnama
Published on
Updated on

Food and Drug Administration Maharashtra : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहिल्यानगर कार्यालयातील पथकाने शिर्डीत पुन्हा एकदा मोठी कारवाई करत तब्बल 700 किलोहून अधिक पेढ्यांचा साठा जप्त केला.

या धडक कारवाईमुळे संपूर्ण शिर्डीत बुधवारी दिवसभर एकच चर्चा रंगली होती, “तुकाराम मुंढे पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले!”

याआधी महिन्याच्या सुरुवातीलाच शिर्डी (Shirdi) येथील प्रसिद्ध ‘चिरंजीव पेढा’ प्रकरण राज्यभर गाजले होते. प्राथमिक तपासणीत या पेढ्यांवर बुरशी आढळल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विभागाचे पथक शिर्डीत दाखल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट पसरली.

अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगर कार्यालयातील पथकाची वाहने कारवाईसाठी शिर्डीत फिरत असताना, स्थानिकांमध्ये “तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) स्वतः शिर्डीत आले आहेत” अशा चर्चांना जोर आला. परिस्थिती अशी होती की, अनेक पेढा विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Tukaram Mundhe action Shirdi pedha
Tukaram Mundhe FDA Action : तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाजपणानं शिर्डीतील भेसळमाफिया धास्तावले! साईंच्या नावावर विकले जाणारे ‘चिरंजीव पेढे’ रडारवर

भेसळ प्रतिबंधक पथकाने देवस्थान परिसरातील सुमारे 8 ते 10 पेढा विक्रेत्यांवर अचानक छापेमारी केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर पेढ्यांसह काही पॅकबंद खाद्य उत्पादनेही ताब्यात घेण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 700 किलो पेढे जप्त करण्यात आले आहेत.

Tukaram Mundhe action Shirdi pedha
Tukaram Mundhe Raid: तुकाराम मुंढेंचा भेसळमाफियांवर प्रहार सुरूच! राज्यभर 30 ठिकाणी छापे; 21 जण अटकेत, 17 आस्थापना सील

पेढ्यांमध्ये भेसळ आहे का?

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्या केवळ पेढे ताब्यात घेण्यात आले आहेत. जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असून, त्यानंतरच पेढ्यांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्य नियमभंग आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. प्राथमिक चौकशीत काही विक्रेत्यांकडून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष

साईसमाधी दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक येतात. यातून शिर्डीतील पेढा व्यवसाय हा मोठा उद्योग मानला जातो. मात्र सलग दोन कारवायांमुळे आता शिर्डीच्या प्रसिद्ध पेढा व्यवसायाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले असून, त्यानंतर या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले असून, तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक कारवाई शैलीची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com