Sanjay Gaikwad Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: पुस्तक जरुर वाचा, आम्हीही ऐकायला येतो... म्हणत संजय गायकवाडांची अखेर दिलगिरी! कॉ. पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाला केली होती शिवीगाळ

दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी तसंच आई-बहिणींवरुन शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत आहे.

Amit Ujagare

Sanjay Gaikwad: दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकात 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख केल्याचा मुद्दा उपस्थित करुन या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी तसंच आई-बहिणींवरुन शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत आहे. राज्यभरात त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यापार्श्वभूमीवर या कृत्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.

पुस्तक जरुर वाचा, आम्हीही ऐकायला येतो

जीवे मारण्याची धमकी आणि आर्वाच्च शिवीगाळ केल्याप्ररणी आमदार संजय गायकवाडांवर कारवाईची शक्यता वाढल्यानं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. गायकवाड म्हणतात, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जगणारे आणि मरणारे आम्ही लोक आहोत. म्हणून पदोपदी त्यांचा आपमान आम्ही सहन करणार नाही. या पुस्तकामध्ये कमीत कमी ५०० ते ७०० वेळेस 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी तर शिवाजी महाराज मराठी वंशाचे नव्हते असा उल्लेख आहे, काही आणखी आक्षेपार्ह आहेत. माझा या पुस्तकाबद्दल काही आक्षेप नाही, पण ज्यानं कोणी ते पुस्तक प्रकाशित केलं आहे, त्यानं फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर करावा"

व्यक्त केली दिलगिरी

त्याचबरोबर मी जी काही रात्रीच्यावेळी त्यांना शिविगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा पत्नीबदद्ल बोललो असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्याला कोणाला बुलढाण्यात येऊन हे पुस्तक वाचायच असेल किंवा आणखी कुठे वाचायचं असेल? त्याला आमची विनंती आहे की, आपण आपल्या बापाचं नावही एकेरी घेत नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असाच यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा, आम्ही पण तुमचं ऐकायला त्याठिकाणी येतो. पण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करुन करोडो हिंदूंचा अपमान करु नका"

संजय गायकवाड काय म्हणाले होते?

दरम्यान, आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन अश्लील शिवीगाळ केली होती. याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली, यामध्ये "छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण?" अशा शब्दांत दिवंगत कॉ. गोविंद पानसरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्याचबरोबर आंबी यांनी पुस्तकातील ऐकेरी उल्लेख दुरुस्त केले नाहीत तर घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर अंबी यांना जीवेमारण्याची धमकी देताना पानसरेंचे काय झालं माहिती आहे ना? असा इशारा दिला होता. ही ऑडिओ क्लीप व्हायरलझाल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले.

गायकवाडांविरोधात पानसरेंचं जाहीर पुस्तक वाचणाचं आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आमदार गायकवाड यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. याप्रकरणी कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात गायकवाडांविरोधात प्रकाशक प्रशांत आंबी यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज पोलीस ठाण्यात सर्वजण एकवटले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारही यासाठी पोलीस ठाण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT