

AAP official statement on MPs joining BJP: आम आदमी पार्टीच्या राज्यसभेतील ७ खासदारांनी भाजपत प्रवेश केल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे. याविरोधात आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले तसंच पक्षांतर करणाऱ्या आपच्या खासदारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
पंजाबच्या जनतेनं या खासदारांना इतकं प्रेम दिलं पण त्यांनी जनतेचा विश्वासघात केला असून जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असं सांगताना प्रशासकीय यंत्रणांना हाताशी धरुन देशभरात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरु असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.
संजय सिंह म्हणाले, पंजाबमध्ये आपचं सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी त्यांनी ऑपरेशन लोटस सुरु केलं आहे. याच ऑपरेशनसाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या आणि भाजपत प्रवेश करत असलेल्या आपच्या गद्दार खासदारांना पंजाबची जनता कायम लक्षात ठेवेन.
हा भाजपचा खेळ असून पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या सरकारच्या चांगल्या कामांना रोखण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणावर सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वी अशोक मित्तल यांच्या इथं ईडीनं छापेमारी केली होती.
त्यामुळं या पक्षांतराच्या गोष्टी अशा प्रकारे जुळतात, ईडीचा छापा पडला आणि तोडलं. याचाच अर्थ भीती दाखवून प्रशासनिक यंत्रणांचा गैरवापर करुन हे ऑपरेशन लोटस चालवलं जात आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगतो की, पंजाबची जनता या गद्दारांना कधीही माफ करणार नाही.
स्वातंत्र्यानंतरची सर्वात जास्त भ्रष्ट पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. या पक्षात कोणी सामिल होऊन ईमानदारीची गोष्ट करतोय याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? ज्या पक्षानं संपूर्ण देशात एक संघटित भ्रष्टाचार केला आहे.
त्या पक्षात सामिल होऊन तुम्ही स्वतःला भ्रष्टाचारविरोधी कसे म्हणून शकाल? तुमच्यावर कोण विश्वास ठेवेन? अशा शब्दांत संजय सिंह यांनी राघव चढ्ढा आणि त्यांच्यासोबत भाजपत गेलेल्या खासदारांवर निशाणा साधला आहे. या फसवणुकीचं उत्तर पंजाबचे लोकच देतील असंही संजय सिंह यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.