Mumbei News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. यानंतर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर भाजप-शिवसेना एकत्र येणार अशा चर्चांना उत आला होता. तर आता भाजप नेते तथ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून चंद्रकांत पाटील सगळ्यांचे मित्र आहेत. तसेच आमचेही, असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट येण्याचे नेमकं कारण काय? युती तुटण्यामागचा खलनायक कोण? असे सवाल उपस्थित केले जात आहे. अशातच राऊत यांनी थेट नाव घेतच Wait and Watch असे म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी, ते आमच्या सगळ्यांचे चांगले मित्र असून ते शिवसेना-भाजप युतीचे समर्थक राहिले आहेत. युतीच्या बाजुने असणाऱ्या जुन्या पिढीतील ते एन नेते असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. तर आता जे भाजपमध्ये हौसे, नवसे आणि गवसे आलेत त्यांना या युतीचे महत्व काय कळणार असा सवाल केला आहे.
शिवसेना आणि भाजपच्या युतीचे नाते हे 25 वर्षांचे असून आमचे संबंध हे हिंदुत्वाशी होते. जे आता आलेल्या कळणार नाहीत. सध्या ज्या भावना चंद्रकांत पाटलांच्या आहेत त्याच त्यांच्या पक्षातील अनेकांच्या आहेत. आम्ही नरेंद्र मोदी यांच्यासोबतही काम केलं आहे. पण तेथे अमित शाह यांचा उदय आणि युतीत मिठाचा खडा पडला असे थेट नाव घेत राऊत यांनी
नरेंद्र मोदी यांच्यासोबतही आम्ही चांगले काम केले पण दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीत वितुष्ट आले. शिवसेना-भाजप युती तुटण्याला शाह हेच जबाबदार असल्याचे संकेत यावेळी राऊत यांनी दिले आहेत.
तसेच राऊत म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्यामागे भाजपमधील काही नेते होते. ज्या कारणांसाठी युती तुटली ती कारणे पाहिली तर आमची भूमिका योग्य होती. आम्ही आमचा हक्क मागत होतो. पण आमचा पक्ष फोडला आणि शाह यांनी तो एकनाथ शिंदेना दिला. आमचा हक्क आणि मुख्यमंत्रिपदाचा दावा शिंदेंना दिल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
शाह यांना शिवसेना फोडायची होती असाही दावा राऊत यांनी यावेळी केला असून यामुळेच शाह यांनी आमचा मुख्यमंत्रिपदावरचा हक्क नाकारला. शाह यांचे आर्थिक हितसंबंध मुंबईत गुंतले असून त्यासाठीच ते शिंदेंचा वापर करून घेतायत असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.