Rohit Pawar, Jaykumar Gore And Sanjay Raut sarkarnama
महाराष्ट्र

Jaykumar Gore : संजय राऊत अन् रोहित पवारांना धक्का? गोरेंकडून हक्कभंग दाखल

Privilege Motion Against Sanjay Raut And Rohit Pawar : जयकुमार गोरे यांच्या विरोधात नाव घेत अधिवेशनात महिलेला फोटो पाठवल्याच्या आरोपावरून काल (ता.5) जोरदार टीका झाली होती. त्याविरोधात हक्क भंग दाखल करणार असल्याचा इशारा गोरे यांनी दिला होता.

Aslam Shanedivan

Mumbai News : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्यावर काल (ता.5) दिवसभारत विरोधकांनी आरोपांची झोड उठवली होती. गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या तक्रारीवरून ही टीका करण्यात आली होती. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय आमदार वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार यांनी गोरेंवर निशाना साधला होता. यामुळे अधिवेशन अधिकच तापले होते. यानंतर गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडत न्यायालयाने माझी निर्दोष मुक्ततता केल्याचे सांगितले होते. तसेच ज्यांनी ज्यांनी बदनामी केली त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी हक्कभंग दाखल केला असून यामुळे खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गोरे यांच्यावर करण्यात आलेले आरोप लय भारी youtube चॅनेलने केले होते. ज्यामुळे त्यांना विरोधकांनी निशाण्यावर घेतलं होतं. तर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांनी संजय राऊत, रोहित पवार आणि लय भारी youtube चॅनेल यांच्या विरोधात हक्क भंग दाखल केला आहे.

जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेने आरोप केले होते. तसेच गोरे यांनी त्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार केल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यानंतर या प्रकरणावरून जोरदार टीका सुरू झाली होती. यानंतर काँग्रेस नेते विजय आमदार वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार यांनी गोरेंवर निशाना साधला होता.

यानंतर विधीमंडळात गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, थेट न्यायालयाची प्रत देत निर्दोष असल्याचे सांगितलं होते. तसेच ज्यांनी ज्यांनी त्यांच्या विरोधात नाव घेऊन आरोप केले होते, त्यांच्यावर हक्क भंग दाखल करणार असे म्हटलं होतं.

नेमके काय आहे प्रकरण?

भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप करत राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवले होते. या पत्रातून जयकुमार गोरे आपल्याला त्रास देत असून मदतीची याचना केली आहे. तसेच गोरे आपल्याला त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो पाठवत असल्याचे सांगितले होते. या गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

SCROLL FOR NEXT