Sanjay Raut Shivsena BJP Raosaheb Danve (1).jpg Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Vs ShivsenaUBT: बंडखोर खासदारांवर तुटून पडलेल्या संजय राऊतांनी अचानक बदलला निशाणा; भाजपच्या बड्या नेत्यावर घसरले

Uddhav Thackeray News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. या बंडापाठीमागचे 'मास्टरमाईंड' भाजप आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हेच असल्याची टीका उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेतेमंडळींकडून सुरू आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. या बंडापाठीमागचे 'मास्टरमाईंड' भाजप आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हेच असल्याची टीका उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेतेमंडळींकडून सुरू आहे. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊतांच्या शिवीगाळामुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षावर ही वेळ आल्याची टीका केली होती. यावर आता राऊतांनी दानवेंनाच आरसा दाखवला आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी गुरुवारी (ता.18) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणजे वेड्यांचा बाजार असल्याचा हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी त्यांचे गद्दार,बेईमान,भ्रष्टाचारी लोकांवर प्रेम आहे हे दिसते! असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.

संजय राऊतांनी या पोस्टमधून जालन्याचे माजी खासदार व भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, गद्दारांबद्दल मी वापरलेली भाषा रावसाहेब दानवे यांना मान्य नाही. जे दानवे शेतकऱ्यांना चोर,साले,बदमाश असे उघडपणे म्हणतात. भाजपला गद्दार चालतात पण प्रामाणिक शेतकरी बेईमान वाटतात, धन्य हो! असंही खासदार राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दानवेंनी काय म्हटलं होतं...?

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या खासदार फुटीवरुन आक्रमक भूमिका मांडताना संजय राऊतांवर निशाणा साधला होता. त्यांनी शिवसेनेच्या उबाठा गटातील सध्याच्या परिस्थितीसाठी भाजप नव्हे, तर पक्षातील अंतर्गत मतभेद कारणीभूत असल्याचा दावा केला होता. भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

तसेच उबाठा गटाचे सहा खासदार फुटले, त्यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार पक्ष सोडत आहेत आणि त्यासाठी भाजपला जबाबदार धरले जात आहे. हा त्यांचा कमकुवतपणा आहे. राऊतांची भाषा अधिक संयमी आणि सुसंस्कृत असती तर आज उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती अशी टीकात्मक टिप्पणी त्यांनी केली होती.

तसेच सततची शिवीगाळ आणि आक्रमक वक्तव्यांमुळेच पक्षातील नाराजी वाढली आहे. तोडफोड करणे ही आमची संस्कृती नसल्याचं रोखठोक मतही माजी खासदार रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलं. तसेच भाजपकडून कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ सुरू नसल्याचं सांगत विरोधकांचे आरोप आरोप फेटाळून लावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT