Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरलेले 'ऑपरेशन टायगर'यशस्वी झाल्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. सहाही खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संसदीय दलाच्या बैठकीसाठी लागू करण्यात आलेला व्हीप धुडकावला आहे. सर्व खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे आता ठाकरेंचे खासदार फुटल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकीकडे चार वर्षांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेना फुटल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेले दोन दिवस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चा तसेच राजकीय घडामोडींनंतरही कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता राज ठाकरेंची तोफ 20 जूनला धडाडणार आहे. ठाण्यात रंगशारदा हॉल येथे महाराष्ट्रम नवनिर्माण सेनेचा महत्त्वपूर्ण मेळावा होणार आहे. कारण राज ठाकरेंनी शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर मनसेच्या प्रमुख नेते पदाधिकारी यांचा मेळावा बोलावला आहे. ते मनसेच्या नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
राज ठाकरे यांच्या मेळाव्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून बोलावण्यात आलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला सहाच्या सहा बंडखोर खासदारांनी दांडी मारली.यामुळे त्यांचा खासदार फुटीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. फक्त अधिकृत घोषणा ही 21 जूनला होण्याची शक्यता आहे.
ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने राज्यात विशेषत: ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत पडद्यामागं मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहे. खासदारांनी केलेल्या बंडामुळे ठाकरेंची शिवसेना चवताळून उठली आहे. यात संतापलेल्या खासदार संजय राऊतांनी तर बंडखोर खासदारांवर अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिल्याचंही दिसून आलं होतं. तर मुंबईसह राज्यातील प्रमुख नेत्यांनी बंडखोर खासदारांवर टीकेची झोड उठवली आहे.
या सगळ्या तापलेल्या राजकीय वातावरणात आता मनसेचा 20 जूनला महत्त्वाचा मेळावा बोलावण्यात आला आहे. मुंबईत विशेषतः घाटकोपर, विद्याविहार आणि गिरगाव परिसरांत जैन धर्मीय साधूंच्या पायी चालण्याच्या मार्गासाठी रस्त्यांवर किंवा सोसायटीच्या आवारात आखण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मनसे विरुद्ध जैन मुनी यांच्यात यावरुन मोठा संघर्ष पेटला आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसर्यांदा फुटली आहे. उद्धव ठाकरेंनी खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावून वा इतरही अनेक शक्य ते सगळे प्रयत्न करुनही खासदारांना थांबवण्यात त्यांना अपयश आल्याचीच चर्चा आहे. ठाकरेंच्या सर्व खासदारांनी वेगळा गट स्थापन करत असल्याचं पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचा मेळावा बोलावला आहे.
राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कान टोचले होते. त्यांनी इतरांचे पक्ष का फोडले जातात, असा सवाल उपस्थित केला होता. भाजपला इतरांचे पक्ष फोडणे, एवढेच काम करायचे असल्याची टीका केली होती.
तसेच त्यांनी दुसरे पक्ष फोडा, त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. 12 वर्ष सत्तेत आहात ना, तर किमान स्वतःचे कार्यकर्ते मोठे करा असा उपरोधिक सल्लाही दिला होता. शर्मिला ठाकरे यांनी दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंपमध्ये चांगली मुलं आहेत, होती, त्यांनी दुसऱ्यांच्या सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल उपस्थित केला होता.
त्यांनी तिकडे ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इकडे उद्धवचा आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. आम्ही पक्षातून बाहेर पडलो आणि आमचे नवीन कार्यकर्ते तयार केले, असा दावाही शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्यावर भाजप मंत्री नितेश राणेंनी त्या कोणत्या राजकीय पदावर नसल्याचा पलटवारही केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.