Sanjay Raut News : महाराष्ट्राच्या राजकारणात अशोक खरात हे प्रकरण एपिस्टीन फाईल आहे. पोलिसांनी जो पेन ड्राईव्ह जप्त केला आहे. त्यात 58 व्हि़डिओ आहेत. हे व्हिडिओ जर पोलिसांनी बाहेर काढले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, कारण यामध्ये भाजपचे मोठे नेते आहेत, असा धक्कादायक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, 'ज्या प्रकराचे व्हिडिओ, फोटो समोर आले आहेत त्यावरून हे प्रकरण महाराष्ट्रातील एपिस्टीन फाईल सारखा आहे. मला असं वाटतंय सत्ताधारी पक्षाचे, भाजपचे असे ही मोठे मोठे नेते आहेत. 58 व्हिडिओ आहेत. पोलिसांनी ते समोर आणले तर महाराष्ट्रातील सरकार पडेल.'
अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर देखील आरोप करण्यात येत आहेत. रुपाली चाकणकर या अशोक खरातला गुरु मानतात. वर्षभरापूर्वी एका स्थानिक वृत्तपत्राने खरातच्या विरोधात बातमी केली होती तेव्हा चाकणकर यांनी त्या वृत्तपत्राच्या संपादकाला धमकावले होते. तसेच त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता, असे सांगिले जात आहे.
भोंदूबाबा खरातने कोट्यवधीची संपत्ती जमवल्याचे देखील समोर आले आहे. त्याची नाशिक शहरातील पाथर्डी येथे सुमारे 150 कोटींची जमीन आहे. तसेच सिन्नरमधील मिरगाव येथे त्यांची कोट्यवधीची जमीन, फार्महाऊस आहे. याच गावात 10 कोटी रुपये खर्चून ते मंदिर बांधत आहेत. विमानतळा शेजारी देखील त्याने कोट्यवधीची जमीन घेऊन ठेवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.