Rupali Chakankar Resign Demand: 'एका बलात्काऱ्याच्या घरी रांगोळी,तर दुसऱ्याचं...'; चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आणखी एका महिला नेत्यानं उचललं मोठं पाऊल

Ashok Kharat News: नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरातला नाशिक पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Karuna Munde Ashok Kharat Rupali Chakankar
Karuna Munde Ashok Kharat Rupali Chakankar Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्कार प्रकरणी अटक केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.मंत्र्यांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत अशा सगळ्या नामवंतांना आपल्या जाळ्यात ओढून प्रसिध्दीस आलेल्या ज्योतिषी खरातबाबत एकापेक्षा एक असे धक्कादायक खुलासे समोर येत आहे.

तर दुसरीकडे महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर अटक झालेल्या खरातवर प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर राजकीय वर्तुळातूनही जोरदार शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत. एवढेच नव्हे तर , त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याचदरम्यान,आता माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी व शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनीही खरात प्रकरणावरुन चाकणकरांना फटकारलं आहे.

शिवशक्ती सेना पक्षाच्या करुणा मुंडे यांनी गुरुवारी (ता.19) नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. याचवेळी त्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याचीही थेट मागणी लावून धरली आहे. त्या म्हणाल्या, महिला आयोगाच्या अध्यक्षा एका बलात्कारी व्यक्तीच्या घरी रांगोळी काढतात आणि दुसऱ्या बलात्कारीच्या पाद्यपूजन करत आहेत. हे महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम आहे का? असा संतप्त सवालही करुणा मुंडे यांनी उपस्थित केला.

रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, नसेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे, रुपाली चाकणकर यांना लाज वाटली पाहिजे.. महिला आयोग पद संविधानिक आणि जबाबदारी पद आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणजे असे बलात्कारी साधुसंत आणि नेता लोकांच्या पाठीशी घालणार आहे का? अशा शब्दातं करुणा मुंडे यांनी चाकणकरांना झापलं आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून माझीही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीतही सगळ्यांकडे पत्र दिल्याचंही मुंडे म्हणाल्या.

Karuna Munde Ashok Kharat Rupali Chakankar
Eknath Shinde strategy: राज्यसभा हुकलेल्या नेत्याला आता थेट केंद्रात मोठी जबाबदारी? एकनाथ शिंदेंच्या आश्वसनांनंतर नाराजी दूर होणार

महिला नेत्या करुणा मुंडे यांनी यावेळी मोठी घोषणा करतानाच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करुणा मुंडे मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. जोपर्यंत चाकणकर राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सोमवारपासून मंत्रालयासमोर मी आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यावेळी करुणा मुंडे यांनी प्रियांका गांधींवर टीका करणाऱ्या कंगना रनौतवरही टीका केली. त्या म्हणाल्या, भाजपमध्ये सामील झाल्यानंतर कंगना रनौत आता ड्रायक्लिन झाल्या का? प्रियांका गांधींनी आजपर्यंत आपली ओढणीही उतरू दिलेली नाही आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करत आहात. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर तुम्ही साडी परिधान करण्यास सुरुवात केली आहे आणि इतरांना चारित्र्यहीन म्हणत आहात.

Karuna Munde Ashok Kharat Rupali Chakankar
Prajwal Revanna Case : माजी खासदाराविरोधात १३ हजार पानी आरोपपत्र, ३९ जणांविरुद्ध गुन्हे अन् अश्‍लील व्हिडिओसाठी ७० पेनड्राइव्ह...

नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशोक खरात हा हायप्रोफाईल लोकांचे भविष्य सांगायचा. राजकीय नेत्यांसह प्रशासकीय क्षेत्रातील बड्या अधिकारीही त्याच्या भामटेगिरीला भुलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नवनवे खुलासे होत असून खरातची हादरवणारी काळी कुंडली समोर आली आहे. अशातच आता कॅप्टन खरातकडेच तब्बल 3 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com