Sanjay Raut - Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena vs BJP : 2014 मध्ये युती तुटण्याचा 'खलनायक' कोण होते? उत्तर देत राऊतांची फडणवीसांना क्लिन चीट!

Maharashtra Political News: 2014 मध्ये युती तुटण्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार नव्हते, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना क्लिनचीट दिली.

Hrishikesh Nalagune

Political News: 2014 साली एका-एका जागेवर 72 तास चर्चा झाली. ओम माथूर त्यांचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन, देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते.

युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्लिनचीट दिली. ते नाशिकमध्ये बोलत होते.

सिक्किमचे राज्यपाल आणि महाराष्ट्र भाजपचे तत्कालिन प्रभारी ओम माथूर यांचा राजस्थान ग्लोबल फोरमच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी त्यांनी युती तुटण्याचा सविस्तर इतिहास सांगितला. "शिवसेनेला 147 जागा देण्यास तयार झाला होतो. मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार होता, पण ते 151 वर आडून राहिल्याने युती तुटली असे म्हटंले.

यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 2014 साली भाजपचे नेते युती तोडण्यासाठी दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते. युती तोडायची हे त्यांचे ठरले होते. फक्त चर्चेचा गुऱ्हाळ सुरू होता. बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते याचा फायदा घ्यावा आणि शिवसेनेला आपण संपवावे हे त्यांचे धोरण होते.

एका-एका जागेवर 72 तास चर्चा झाली. ओम माथूर त्यांचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्की सांगेन, देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते.

युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती, तरीही भाजपचा वरुन कार्यक्रम आला आणि त्यानुसार युती तुटली, असे त्यांनी सांगितले. यातून एक प्रकारे युती तुटण्याला फडणवीस जबाबदार नव्हते असे म्हणत राऊत यांनी त्यांना क्लिन चीट दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT