Congress Politics : काँग्रेसला चिंतनाचं 'गुजरात मॉडेल' वाचवणार? देशभरातील नेते करणार मंथन

Congress strategy after assembly defeat : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर विधानसभेत काँग्रेसचा दारुण पराभव कसा काय झाला? असा प्रश्न समस्त काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना पडला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही काँग्रेसला पराभवचा सामना करावा लागला आहे.
Congress
Congresssarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 25 Mar : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर विधानसभेत काँग्रेसचा दारुण पराभव कसा काय झाला? असा प्रश्न समस्त काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना पडला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही काँग्रेसला पराभवचा सामना करावा लागला आहे.

या सर्व निवडणुकांमधील अनुभव आणि यशापयाशाच्या चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद शहरात आयोजित करण्यात आले आहे. आठ आणि नऊ एप्रिलला होणाऱ्या या अधिवेशनाच्या नियोजनाची जबाबदारी नागपूरच्या दोन प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक हे अधिवेशनच्या समन्वय समितीचे प्रमुख असून सचिव रामकिशन ओझा यांच्यावर स्वागत समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा बिगुल नागपूरमधून (Nagpur) फुंकला होता. पक्षाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यासह सर्वच बडे नेते सहभागी झाले होते.

Congress
Laxman Hake : 'आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू, कोर्टात जाऊ, पण रायगडावरील ते शिल्प हटवू देणार नाही' ओबीसी नेत्याने ठणकावलं

संविधान वाचवा अभियानाचा समारोपही याच कार्यक्रमात करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. मात्र हे यश विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला टिकवता आले नाही. जवळपास सर्वच राज्यातील निवडणुका आटोपल्यानंतर अहमदाबाद येथे होणारे काँग्रेसचे अधिवेशनात नवीन रणनीती आखली जाणार असल्याचे सांगण्यात येतं आहे.

तर या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा व मंथनसुद्धा केले जाणार आहे. भाजप नवे आणि जुने मुद्दे उकरून काढून काँग्रेसवर आरोप करत आहे. याला प्रत्त्युतर देण्यासाठी नव्याने मोहीम हाती घेतली जाणार आहे. सोबतच काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याचा विस्तारसुद्धा केला जाणार आहे.

Congress
Devendra Fadnavis: 25 वर्षे मी सभागृहात..पहिल्यांदा असं होतंय! फडणवीस विधिमंडळात हतबल: काय घडलं?

या अधिवेशनात काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी विविध कार्य आणि योजनांवर उघडपणे चर्चा करणार असल्याचे रामकिशन ओझा यांनी सांगितले. अधिवेशनात विविध राष्ट्रीय व समाजिक विषयावरील चर्चेसोबतच जिल्हा स्तरावर कुठले विषय घेऊन आंदोलन करायचे यावरही चर्चा केली जाणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com