Eknath Shinde, Amit Shah, Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Shinde Vs Thackeray : 'एकनाथ शिंदेंनी अमित शहांचे पाय धुतले...', दिल्लीतील भेटीवर ठाकरेंच्या शिलेदाराचा प्रहार

Eknath Shinde Faces Backlash For Delhi Visit: पावसाळी अधिवेशनसोडून एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. शिंदेंच्या या भेटीवरून संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

Roshan More

Sanjay Raut News : पावसाळी अधिवेशनसोडून उपमुख्यमंत्री बुधवारी संध्याकाळी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना त्यांनी दिल्ली दौऱ्या केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. गुरुवारी गुरुपौर्णीमेच्या दिवशी शिंदे दिल्लीतच होते. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर जोरदार प्रहार केला आहे.

संजय राऊतांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले. दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले.'

संजय राऊतांनी दावा केली की, शिंदेंनी अमित शाहांचे चरण धुतल्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली. बाकीचा तपशील लवकरच, असे देखील राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गँगवाॅरीची माहिती देण्यासाठी दिल्लीत...

पावसाळी अधिवेशनसोडून एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्याबाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, महायुती सरकारमध्ये गँगवाॅर सुरू आहे. या गँगवाॅरची माहिती देण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत.

शहा-शिंदेंमध्ये काय चर्चा?

आगामी महापालिका निवडकीत ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना कसे रोखायचे याविषयीच्या रणनीतीबाबत शिंदे-शहा यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत जाण्यापासून रोखण्यासाठी काय करत येईल? यावर देखील चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत काय रणनीती असावी याबद्दल देखील शहा-शिंदेंमध्ये चर्चा झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT