Sanjay Raut News : मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने मदत द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच मराठवाड्यातील पूरग्रस्तांना स्वतःफोटो आणि चिन्ह छापलेल्या पिशव्यांमधून मदत करण्यात येत आहे, असे सांगत हा किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायेत आणि त्या मुडद्यांवर तुम्ही राजकारण करताय, असा संताप संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर व्यक्त केला.
ते म्हणाले, मिंद्या सारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकून मदत राजकारण करत आहेत, अशा प्रकारचे प्रचाराचे राजकारण करणे निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे.
'लोक मरतायेत, आक्रोश चाललाय. पण निर्दयपणे काम करणारे हे सरकार आहे. प्रत्येक ठिकाणी पैशाची मस्ती. येवढीच पैशाची मस्ती असेल तर सरकारी मदतीवर स्वतःचे फोटो लावण्याऐवजी घरच्या तिजोऱ्या रिकाम्या करा, ठेकरेदारांकडून लुटलेले पैसे, नगरविकास खात्याने समृद्धी महामार्गात, शक्तिपीठी महामार्गात लुटलेला पैसे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोकळा करा.', असे देखील राऊत म्हणाले.
राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळत असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही. नतेचा आक्रोश सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम विरोधी पक्ष नेता करत असतो.राज्याला दोन दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत पण विरोधी पक्ष नेता नाही! ही लोकशाही साठी लाजिरवाणी गोष्ट आहे.'
मराठवाड्यात पूर परिस्थिती गंभीर आहे . 60 लाख एकर वरील पीक मातीसह वाहून गेले ;अनेक पिढ्या त्यामुळे शेती करू शकत नाहीत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार) पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. ३६ लाख शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवावाच लागेल, असे देखील राऊत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.