Local Body Elections : ‘सुप्रीम’ आदेशानंतर 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आयोगाचं पहिलं मोठं पाऊल 

State Election Commission announces voter list program : जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.
Maharashtra local body elections
Maharashtra local body electionsSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात महत्वाचे :

  1. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका 30 जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

  2. राज्य निवडणूक आयोगाने 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादी कार्यक्रम जाहीर केला.

  3. झेडपी व पंचायत समितीसाठी नोव्हेंबर अखेरीस ते डिसेंबरमध्ये मतदानाची शक्यता.

Election schedule details for 32 ZPs and 336 Panchayat Samitis : सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका 30 जानेवारीच्या आत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आयोगाला मुदतवाढ दिली जाणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता राज्यातील 32 ZP आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिलं मोठं पाऊल टाकलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. आयोगाने यापूर्वीच या निवडणुकीसाठी विधानसभेची मतदारयादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लागू असेल, असे स्पष्ट केले आहे. विधानसभेची मतदारयादी जशीच्या तशी संबंधित प्रभागांमध्ये विभागली जाणार आहे.

आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे आता याच मतदारयादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.  जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra local body elections
जिल्हाधिकारी होताच ‘रील’ बनविणाऱ्यांविरोधात पहिला आदेश

निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी हरकती व सूचना मागविल्या असल्याने राज्यात महापालिका निवडणूका त्यानंतर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतरच महापालिकेच्या निवडणुकांचा धुराळा उडेल. त्यासाठी जानेवारी महिना उजाडणार आहे.

झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्यात होऊ शकतात. याच कालावाधीत महापालिका निवडणुकांसाठी मतदारयादीवर हरकती व सूचना मागवल्या जाऊ शकतात. तसेच निवडणुकांचे वेळापत्रकही याचदरम्यान जाहीर होऊ शकते.

Maharashtra local body elections
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंना ‘हे’ पाऊल उचलावंच लागेल; सरकारकडून दुर्लक्षित विभाग 'सशक्त' करायचाय...

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: सुप्रीम कोर्टाने कोणत्या तारखेपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले?
A: 30 जानेवारीपूर्वी.

Q2: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची किती मतदारसंघ आहेत?
A: 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समित्या.

Q3: प्रारुप मतदारयादीवर हरकती कधी दाखल करता येतील?
A: 8 ते 18 ऑक्टोबर दरम्यान.

Q4: अंतिम मतदारयादी कधी जाहीर होणार?
A: 27 ऑक्टोबर रोजी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com