CBI FIR Disha Salian : शिवसेना कुणाची? केंद्रातील मोदी सरकारचे डिलिमिटेशन अन् दिशा सालियन प्रकरणाचे कनेक्शन काय आहे, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज परखड भूमिका मांडली. दिल्लीतून ठाकरे कुटुंबाच्या बदनामी सुरू आहे.
सह्याद्रीवर बैठक, त्यानंतर दोन नेत्यांचा एकाच वाहनातून प्रवास अन् त्यानंतर 16 पानी फिर्यादीतून एकच पान कसे बाहेर आले, यावर परखड भाष्य करताना, या अनैतिकतेच्या लढाईविरोधात लढणार असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी देशात डीएमके कुटुंब, नवीन पटनाईक, चंद्रबाबू नायडू आणि कुटुंब, ममता बॅनर्जी आणि कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाविरोधात बदनामीची मोहीम सुरू केली आहे. या बदनामी मुख्य कारण आहे, ते म्हणजे न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई आता एका वळणावर येऊ थांबली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या शेड्युलनुसार निष्पक्ष निर्णय दिल्यास, महाराष्ट्रातील राजकारण बदलून जाईल. ठाकरे कुटुंब आणि शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी येईल. म्हणून असे हे उद्योग सुरू आहेत. सीबीआयने तटस्थ तपास कारावा, असे सांगितले.
दिशा सालियन हिच्या वडिलांनी आरोप केले आहे. पण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर जास्त भाष्य करता येत नाही. ते काल आणि आज काय म्हणत आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आमची भूमिका लढण्याची आहे, लढत राहू, असे सांगताना आमचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले आहे. बदनामीच्या मोहीमा सातत्याने वाट्याला आल्या आहेत. त्यातूनही आम्ही तावून-सलाखून बाहेर पडलो आहोत, असे राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरेंभोवती या विषयाच्यानिमित्ताने राजकीय केंद्रीय विषय उभा राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. यानंतर महाराष्ट्रात ज्या घडामोडी होतील, त्याचा परिणाम देशावर होणार आहे. त्यातून दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना एक तटबंदी निर्माण करायची आहे. दुसरे म्हणजे सातत्याने आमच्यावर दबाव आहे की, डिलिमिटेशनला (परिसीमन) पाठिंब्याचा! महाराष्ट्रात जी अन्यायाविरोधात लढाई सुरू आहे, त्यात आदित्य ठाकरे सातत्याने केंद्रस्थानी आहेत. सातत्याने सरकारचे, महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे ते बाहेर काढत आहेत. हे थांबवण्यासाठी चाललेले हे प्रयत्न आहे. परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दिशा सालियन प्रकरणात राष्ट्रीय स्तरावर आलेल्या बातम्यांविषयी बोलताना संजय राऊत यांनी 16 पानांच्या फिर्यादीमधील एकच पान कसे बाहेर येते. रविवारी सह्याद्री विश्रामगृहावर बैठक झाली, दोन 'महान' नेते एकाच गाडीतून एशियाटिक ग्रंथालयात गेले. या प्रवासातील बैठकीत जे ठरले गेले, त्यानुसार हा फिर्यादीतील कागद बाहेर आला गेला, असा दावा केला.
आमच्यावर अैनितक दबाव आहे. केंद्रातील सरकार अंतर्गत विरोधाने खिळखिळं झालेले आहे. जनतेचा प्रचंड रोष आहे. अशा प्रकारच्या घटना, कथा रचून, जनतेची दिशाभूल केली जात आहे, याकडे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.