Sanjay Raut
Sanjay Raut  Sarkarnama
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांवर त्यांच्या लायकीनुसार सव्वा रुपयाचा दावा ठोकणार: संजय राऊत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''भाजपची (BJP) दळभद्री आरोप करण्याची संस्कृती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी जे काही आरोप केलेत ते मला मान्य नाही. यासाठी पुढच्या चार दिवसांत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा नाही तर त्यांच्या लायकीनुसार सव्वा रुपयाचा दावा ठोकणार,' अशा घणाघाती शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.

'सामना'च्या अग्रलेखाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या पत्नीवरील पीएमसी घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन डिवचले. “मला ईडीचा अनुभव नाही. पण इडीचा अनुभव येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केल्यावर ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केलात. हे सर्व पाहिल्यावरून मला वाटले की, पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार,” असं खोचक टोला पाटलांनी राऊतांना लागावला होता. याला संजय राऊत यांनी तितक्याच सडेतोड शब्दांत उत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी विरोधी पक्षासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही समाचार घेतला आहे.

ओबीसी आरक्षणावर संजय राऊत म्हणाले...

ओबीसी आरक्षण वर कायदेशीर बाजू समजून घेऊनच अध्यादेश काढण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे. मग ओबीसी आरक्षण वर राज्यपालांना विलंब करायचाय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर कायदेशीर सल्ला मागितला असून या अध्यादेशावर सही केलेली नाही. मग राज्यापलांना सहीचा प्रॉब्लेम असावा राज्यपाल आपल्या पदाचे अवमुल्यन करत आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसी स्विकारणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. हे भाजपनं त्यांना समजावून सांगायला पाहिजे. असही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर १२ आमदारांच्या नियुक्त्या राज्यपालांनी का थांबवण्याचे कारण काय, तेही त्यांनी स्पष्ट सांगावं.

रोहीत पवारांनी भगवा झेंडा बसवण्याबाबत संजय राऊत म्हणाले...

रोहीत पवारांनी भगवा झेंडा बसवला तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, असं म्हणत रोहीत पवार भगवा ध्वज बसवत आहेत, भगवा झेंडा कोणा एका पक्षाचा नाही शिवाजी महाराजांचा झेंडा आहे, अशा शब्दांत त्यांना पाठिंबाही दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT