Mumbai : बारसू प्रकल्पावरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता आघाडीतही बारसू प्रकल्पावरुन मतमतांतरे पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर संजय राऊतांनी टीकात्मक टिपण्णी केली. यावर भाजप नेते व आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे.
भाजपकडून संजय राऊतां(Sanjay Raut)वर फक्त नितेश राणेच बोलतील असं जाहीर करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊतांसह महाविकास आघाडी, उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राणे म्हणाले, आत्तापर्यंत महाराष्ट्रात जोरजोरात बोलणारे संजय राऊत असंही सांगायचे की मी पवारांचा माणूस आहे.
पण आज ते आदरणीय शरद पवार यांच्या भूमिकेलाच विरोध करताना दिसले. तुम्ही उद्धव ठाकरेंचेही नाहीत आणि शरद पवारांचे नाहीत. पण नेमका कुणाचा आहे? संजय राऊत राजकारणातले लावारिस आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला
शिवसेनेची स्थापना कधी झाली ते माहित नाही आणि...
नितेश राणे यांनी राऊतांना टोला लगावताच एकाच दिवसात त्यांच्यात इतका फरक पडेल अशी अपेक्षा नव्हती. इतक्या लवकर एम टीव्हीचं आस्था चॅनल होईल असं वाटलं नव्हतं. लगेच आमच्या देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होईल आणि एवढं तोंड पडलेलं दिसेल असं खरंच वाटलं नव्हतं.
मी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार म्हटल्यावर यांचे डेसिबलच कमी झाले, माझ्यासाठी गोष्टी इतक्या सोप्या करु नका असंही नितेश राणे म्हणाले आहेत. एवढंच नाही तर संजय राऊत यांना शिवसेनेची स्थापना कधी झाली ते पण माहित नाही असंही राणे (Nitesh Rane)म्हणाले.
शरद पवारांच्या भूमिकेवर राऊतांची टीकात्मक टिप्पणी..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारां(Sharad Pawar)नी बारसू प्रकल्पावरुन राज्य सरकारला स्थानिकांना विश्वासात घेऊन चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, बारसूच्या संदर्भात शरद पवारांचं मी ऐकलं. ते म्हणाले स्थानिक लोकांशी चर्चा करा, त्यांना विश्वासात घ्या. म्हणजे काय करायचं? त्यांचा विश्वासच नाहीये मुळात या सरकारवर असंही विधान राऊतांनी केलं होतं.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.