-रूपेश कदम
Maan News : माण तालुक्याचे Maan Taluka सुपुत्र, माजी मंत्री महादेव जानकर यांनी राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर आणण्याची करामत केली आहे. महादेव जानकर Mahadev Jankar यांच्या मातोश्री गुणाई यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या 'माता गुणाई अॅग्रो फार्मर्स फेड व प्रोड्युसर कंपनी लिमिटेड' या कंपनीचे उद्घाटन कार्यक्रमात माण तालुक्यातील सर्व विरोधक मतभेद विसरून एका व्यासपीठावर आले होते.
माण तालुक्यातील राजकारणाने मागील काही वर्षात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या ना त्या कारणाने इथले राजकारण कायम चर्चेत असते. अपवाद वगळता बहुतांशी प्रसंगी एकमेकांना टाळण्याकडे व उणीदुणी काढण्याकडेच नेते मंडळींचा कल असतो. मात्र या सर्व परिस्थितीला छेद देणारी घटना काल माण तालुक्यातील जनतेने पाहिली.
महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाई यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या 'माता गुणाई अॅग्रो फार्मर्स फेड व प्रोड्युसर कंपनी लिमिटेड' या कंपनीचे उद्घाटन श्री जानकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते व आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस अभयसिंह जगताप, काशीनाथ शेवते, रासपचे बबन विरकर, अर्जुन काळे, दादासाहेब काळे, आप्पासाहेब पुकळे, विलासराव माने, मामूशेठ विरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी समोर उपस्थितांच्यात सुध्दा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मांदियाळी होती.
सध्या विविध मुद्द्यावरून गढूळ झालेले व खटाव बाजार समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तापलेले माण-खटाव मधील वातावरण पाहता वरील सर्व नेत्यांची उपस्थिती आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. हा धागा पकडून श्री जानकर यांनी सुरूवातीलाच सांगितले की गोरे, देशमुख, देसाई, जगताप हे सर्व एकत्र आले तर माण तालुक्याचा राज्यात सर्वात जास्त विकास होईल. या सर्वांच्या ज्ञानाचा, शक्तीचा व अनुभवाचा उपयोग करून माता गुणाई कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांचे जीवनमान सुधारण्याचा आपण प्रयत्न करु.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.