Karnataka Election 2023 :  Devendra Fadnavis News :
Karnataka Election 2023 : Devendra Fadnavis News :  Sarkararnama
महाराष्ट्र

Karnataka Election : राऊतांनी मराठी भाषिकांचा मुद्दा तापवला, फडणवीसांच्या सभेत एकीकरण समिती दाखवणार 'काळे झेंडे'

सरकारनामा ब्यूरो

Belgaon : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीतील भाजपसमोर काँग्रेस, जेडीएसनं तगडं आव्हान उभं केलं आहे. आता याच प्रचारात महाराष्ट्रातील नेतेही सहभागी होणार असल्यामुळे सीमावादाचा मुद्दा पुन्हा गाजणार असल्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी रोड शो केला. त्याचबरोबर त्यांची जाहीर सभाही झाली.यावेळी त्यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरुन राज्यातील भाजपवर टीकेची झोड उठवली. तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारलाही धारेवर धरले.

कर्नाटक निवडणुकीवेळी सातत्यानं मराठी भाषिकांचा मुद्दा उचलून धरला जातो. याहीवेळी तेच पाहायला मिळत आहे. मराठी उमेदवारांविरोधात आपल्या पक्षासाठी सीमाभागात आपापल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. त्यामुळे आता सीमाभागातील मराठी माणसांनी राज्यातील नेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेळगावमध्ये होणाऱ्या जाहीर सभेवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त करणार आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची बेळगावमध्ये जाहीर सभा होत आहे. यांच्या सभेत महाराष्ट्र एकीकरण समिती फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार आहे. याबाबतची घोषणा खासदार संजय राऊत यांच्या बेळगावमधील जाहीर सभेनंतर समितीकडून व्यासपीठावरच करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, सांगली जिल्ह्यातील काही सीमावर्ती भागातील गावांवर दावा ठोकल्यानं सीमावादाचा मुद्दा चांगलाच चिघळला होता. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात देखील उमटले होते.यावेळी महाविकास आघाडीसह ठाकरे गटाने सीमावादावरुन शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रय़त्न केला होता.आता कर्नाटक निवडणुकीतही ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला अडचणीत आणण्यासाठी, मराठी भाषिक, सीमावादाचे मुद्दे उचलून धरले आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंही कर्नाटक प्रचारासाठी जाणार

कर्नाटकच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी जाणार आहेत. शिंदे हे ६ मे ते ९ मे हे कर्नाटकमध्ये प्रचार करणार आहेत. या चार दिवसांत निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रातलं डब्बल इंजिन सरकार किती चांगलं काम करत आहे. मात्र बेळगाव, बेंगळूरु या परिसरात महाराष्ट्रीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मराठी मतांना आकर्षित करण्यासाठी शिंदे कर्नाटकात रोड शो करणार असल्याचंही माहिती समोर येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT