Uddhav Thackeray Eknath Shinde Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena UBT Politics : एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेट, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'तो ***आहे...'

Sanjay Raut Reacts to Eknath Shinde Raj Thackeray Meeting : संजय राऊत म्हणाले, त्यांच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस काय ते ठरवतील. अमित शाह हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख आहेत.

Roshan More

Raj Thackeray Eknath Shinde Alliance: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेलो होते. राज ठाकरे यांनी शिंदेंसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. मात्र, एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. या भेटीवर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांनी एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, 'आमरसपुरी खायला गेला असेल चाट्या आहे तो. काल अमरासपुरीचा बेत होता ना. मी खोटं बोलत नाही. काल एकनाथ शिंदेंचा उपवासाचा दिवस होता.'

महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने ही ठाकरे-शिंदे भेट महत्त्वाची मानली जात असताना संजय राऊत म्हणाले, त्यांच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस काय ते ठरवतील. अमित शाह हे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळेच ते आल्यानंतर शिंदे त्यांना भेटायला जात असतात. तसेच राज ठाकरेंच्या पक्षाविषयी आपण सांगू शकत नाही पण त्यांची ध्येय धोरणंही दिल्लीतून ठरवली जात असल्याचे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील तीन पक्षांचे प्रमुख अमित शाह आहेत. त्यामध्ये शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. हे तीन पक्ष अमित शाह चालवतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आम्ही जनतेला सोबत घेऊ...

कुठल्याही निवडणुका नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिबिर हे नाशिकमध्ये आज होत आहे.राज्याची जनता अस्वस्थ आहे. जनतेला बरोबर घेऊन आम्हाला काय करता येईल, याचा विचार आम्ही करतो आहोत.

पक्ष बांधणी, संघटना बांधणी, जनतेला सोबत घेऊन काम करणे यासाठी आजचे शिबिरी महत्त्वाचे असल्याचे राऊत म्हणाले. या शिबिरावरून लक्ष विचलित करण्यासाठी दर्ग्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

ठाकरे-शिंदे भेटीत काय ठरले?

राज ठाकरे यांच्या भेटीत काय झाले याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते म्हणाले, आमची भेट ही सदिच्छा भेट होती. आम्ही पूर्वी एकत्र काम केले आहे. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीत आम्ही बाळासाहेबांच्या आठवणीना उजाळा दिला. या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT