
Mumbai News, 16 Apr : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.15) रात्री मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी शिंदेंसोबत मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते.
एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) अचानक भेट घेतल्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता या सर्व चर्चांवर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टीकरण दिलं आहे.
आमची भेट ही केवळ आणि केवळ सदिच्छा भेट होती. बाळासाहेबांच्या आठवणीने आम्ही पुन्हा जुन्या आठवणीत रमल्याचं शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं. ते म्हणाले, मागील अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूक झाल्यापासून दोघांचीही एकमेकांना भेटण्याची इच्छा होती. आज बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
आम्ही एकत्र काम केल्यायामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असं शिंदे यांनी सांगितलं. शिवाय या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही तर मुंबईतील विकासकामांवर चर्चा झाल्यांही यावेळी ते म्हणाले.
दरम्यान, घरात बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, असं म्हणत त्यानी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिंदे म्हणाले, "घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी काम करणारे लोक हवेत. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही, तर नेहमीच काम करत असतो."
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.