Sanjay Raut, Narayan Rane sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'तेव्हा ते मांडलिक होते अन् आता हे भाजप अश्रीत...'; नारायण राणेंच्या 20+0 टीकेवर संजय राऊतांची खरमरीत टीका

Sanjay Raut On Narayan Rane : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. ज्याच्यावर भाजपचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टोला लगावला होता.

Aslam Shanedivan

Dhule News : धुळे दौऱ्यावर असलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतस यांनी चौफेर टीका केली. त्यांनी भाजपचे महायुती सरकार, माणिकराव कोकाटे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भाजप खासदार नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला. यावेळी राणेंनी केलेल्या शिवसेनेवरून टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना राणें आता भाजप अश्रीत असल्याचा टोला लगावला आहे. तर अजित पवार यांची आमदारांनी सोडलेल्या साथीवर देखील त्यांनी टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर राणे यांनी खोचक टोला लगावताना 20 अधिक शून्य बरोबर किती? असा सवाल करत केला होता. तर नांदीचा काय फरक पडणार? भाजपचे 134 आणि महायुतीत तिघांचे मिळून 200 आमदार आहेत. सगळ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठिंबा आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरीही काही फरक पडत नाही, असा दावा केला होता.

यानंतर राणेंच्या त्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतला आहे. राणेंना मी फार किंमत देत नाही. ते ओव्हर रेटेड असून आता भाजप अश्रीत असल्याची टीका केली आहे . तसेच राणे दहा वर्ष काँग्रेस पक्षात होते. त्याआधी 25 वर्ष शिवसेनेत होते. शिवसेनेतून काँग्रेस आणि कांग्रेस सोडल्यानंतर त्यांनी त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. पण तोही ते चालवू शकले नाहीत आणि आता ते भाजप अश्रित आहेत. ब्रिटिश आणि मोघलांच्या काळात देखील जे स्वतःला राजे समजायचे ते मांडलिक होते. आणि आता हे देखील भाजपचे अश्रीत असल्याची टीका राऊत यांनी राणेंवर केलीय.

पैसे कमी पडले की...

दरम्यान नागालँडचे आमदार पवार साहेबांकडे आले. नागालँड, मेघालय, मणिपूर, सिक्कीम ही लहान राज्ये आहेत. इथे पहिल्यापासूनच महाराष्ट्रातील पैशांचा खेळ चालतो. पैसे घेऊन सरळ मतं विकत घेतली जातात. आताही पैसे कमी पडले की ते सरळ दुसऱ्या पक्षात जातात, असे त्यांनी म्हटलं आहे.

कोकाटेंना या खात्यांमध्ये रस नाही

आपला देश हा कृषिप्रधान देश असून कृषी खात आणि शिक्षण खातं हे आपल्या मंत्र्यांना शिक्षा वाटते. मंत्र्यांना मलाईदार खाते हवं असतं. यामुळेच कोकाटेंना या महत्त्वाच्या खात्यांमध्ये रस नसल्याचे ते आता मान्य करत आहेत.

भाजप सरकार

पुण्यापाठोपाठ धुळ्यात देखील व राज्यात विविध ठिकाणी महिलांचा छळ करून मारल्याच्या घटना घडत आहेत. गेल्या पाच वर्षात लोकांच्या मनातील कायद्याची भीती पूर्ण संपली आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यात कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे आपल्या पाठीशी कोणीतरी आहे म्हणून कुठलाही कृत्य करताना कुणी घाबरत नाहीये. त्यांना पाठीशी घालणारे हे सरकार असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत पांढऱ्या पायाचे असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर देखील राऊत यांनी कोण पांढऱ्या पायाचा? आम्ही अंधश्रद्धा मानत नाही. रेडे आणि बदक कापून ज्यांना वाटतं की सत्तेत आलो. काळ्या अन् पायाचे पांढऱ्या पायाचे, जिभेवर डाग असलेलेच अशी टीका करतात. तुमचं कर्तुत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आला आहात आणि अमित शहा यांचे तुम्ही अश्रीत आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत. तुमचा पक्ष हा अमित शाह यांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष असल्याचा पलटवार राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT