Sanjay Raut politics : धुळे रोकड गैरव्यवहार प्रकरणी राऊतांना फडणवीसांवर भलताच कॉन्फिडन्स; म्हणाले...

Background of the Dhule Cash Misappropriation Case : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेना नेते संजय राऊत जळगाव दौऱ्यावर होते.
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : धुळे विश्रामगृहावर सापडलेल्या रोख रकमेबाबत वाद अद्यापही सुरूच आहे. या विषयावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील स्थानिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे पक्षावर टीका केली. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेना नेते संजय राऊत जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. जळगाव महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत शिवसेना ठाकरे पक्षाकडून संघटनात्मक चाचपणी सुरू आहे. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी धुळे येथील रोकड गैरव्यवहार प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

राऊत म्हणाले, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने याबाबत आवाज उठवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात लक्ष घालून ते तडीस नेतील. मुख्यमंत्री गुन्हेगारांना सोडणार नाहीत, असा विश्वास आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
Ajit Pawar News : अजित पवारांना सर्वात मोठा झटका; 7 आमदारांनी सोडली साथ, ‘या’ राज्यात पक्ष फुटला...

खासदार राऊत यांनी यावेळी राज्यभर विरोधी पक्षातील नेत्यांचे सत्ताधारी पक्षात होणारे पक्षांतर याबाबत चिंता व्यक्त केली. काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही. असे स्वार्थी लोक सत्ताधारी पक्षात प्रवेश करीत आहेत. अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय यंत्रणांचे दडपण आणि दबाव यामुळे अनेक नेते सत्ताधारी पक्षात जात आहेत. हे सर्व लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

सुडाचे राजकारण आणि केंद्रीय यंत्रणांचा दबाव याबरोबरच सत्तेचा हव्यास असल्याने नेते सत्ताधारी पक्षात सामील होत आहे. त्यातूनच तत्वाच्या राजकारणाला मूठमाती दिली जात असल्याची खंतही राऊतांनी व्यक्त केली. स्वार्थी नेते सत्ताधारी पक्षात सामील होत आहेत. त्याचा मतदार आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर काहीही परिणाम होणार नाही. स्वार्थी नेते पक्ष सोडून जात असल्याने नवे नेतृत्व आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये नव्या नेतृत्वासाठी स्पेस उपलब्ध होत आहे. त्यातून शिवसेना पक्ष नव्या दमाच्या तरुणांना संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
Ahilyadevi Holkar Jayanti : पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती; राष्ट्रपती, पंतप्रधान आले नाही, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार, यात कोणताही बदल होणार नाही. दोन्ही पक्षांतील तसेच राज्यातील हजारो नागरिकांची ही अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्ही राज ठाकरे यांच्या शिवसेनेला सहकार्याच्या भूमिकेचे मनापासून स्वागत केले आहे, असेही राऊतांनी स्पष्ट केले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com