Narayan Rane
Narayan Rane  sarkarnama
महाराष्ट्र

बाळासाहेब आणि उद्धव यांचे कपडे उतरवण्याची धमकी राऊतांनी दिली होती : राणेंचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. काल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत, शिवसेना (Shivsena) यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनाप्रमुख जणू काही आपणच झाले आहोत, असा संजय राऊत यांचा आवेश होता. पण हा शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर यांचे लक्ष हे शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे, असा गंभीर आरोप राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांना कळत नाही, राऊत हे शिवसेनेमध्ये सुरुंग लावत आहेत, असेही राणे म्हणाले.

राणे पुढे म्हणाले, संजय राऊतांना मी आज ओळखत नाही. माझ्याकडे त्यांची कुंडली आहे. सगळे व्यवहार माझ्याकडे आहेत. उद्धव ठाकरेंच्या डोस्पिज केलेल्या गुन्ह्याबद्दल, झालेल्या व्यवहारांबद्दल तुझ्यापेक्षा मला माहित आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांना फटकारले. ईडीच्या अधिकाऱ्यांवर ३०० कोटी घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी शांत बसू नये. घेवून जावं त्याला आणि जरा चांगली पुजा करावी आणि विचारावं ३०० कोटी कोणाकडून घेतले ते दाखवा. त्याशिवाय त्यांच तोंड बंद होणार नाही, असेही राणे म्हणाले.

या मंत्रिमंडळातील किती लोक आत गेले आणि किती जाणार आहेत? यावर राऊत का बोलत नाहीत? सारखं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करतो. तुझी लायकी काय? कोण तु, कुठे आहे तु? असे काही आक्रमक प्रश्न राणे यांनी विचारले. याला पहिल्यांदा खासदारकीचे तिकीट मिळाले नाही तेव्हा तो बोलला होता, शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे कपडे उतरविन, अशी धमकी संजय राऊत यांनी दिली असल्याचा दिल्याचा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. आता बोलतो साहेबांबद्दल. लायकी आहे का? साहेबांचे आशिर्वाद म्हणे, तुझ्यासारख्याला, कदापी नाही, असेही ते म्हणाले.

साहेबांबद्दल बोललेले मी कधीही ऐकून घेतलेले नाही. आता फक्त आला पद मिळवायला आणि पैसे मिळवायला. कुठे होता, कसा होता मी पाहिलं आहे. दुसऱ्यांवर आरोप करणं हे तुझं काम नाही ते. पगारी नेता आहेस तु, असेही राणे यांनी संजय राऊत यांना फटकारले. तसेच प्रविण राऊतांच्या चौकशीनंतर आपल्याला अटक होणार या भितीखाली संजय राऊत आहेत, अनिल परब आत जाणारचं आहेत, पण त्याबरोबर तु पण आत जाणार आहेस. तसेच ईडीच्या नादाल न लागण्याचा सल्ला देखील राणे यांनी यावेळी बोलताना संजय राऊत यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT