संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचयं! उद्धव ठाकरेंच्या खुर्चीखाली सुरूंग पेरतायेत!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना (shivsena) भवनात पत्रकार परिषद घेत, भाजप नेत्यांवर आरोप केले होते.
Sanjay raut- Narayan Rane
Sanjay raut- Narayan Rane Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना (shivsena) भवनात पत्रकार परिषद घेत, भाजप नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते आज (ता.१६) मुंबईमध्ये भाजप (BJP) कार्यालयात बोलत होते. त्यावेळी त्यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत हा पूर्णपणे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा माणूस असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे शरद पवारांच्या सहकार्याने ते मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असल्याची टीका राणे यांनी केली.

या वेळी राणे म्हणाले, प्रवीण राऊत यांची ईडीने चौकशी केली, त्यानंतर राऊत घाबरले. प्रवीण राऊत यांनी ईडीला असे काय सांगितले, असा सवाल राणे यांनी केला. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनाप्रमुख जणू काही आपणच झाले आहोत, असा संजय राऊत यांचा आवेश होता. हा शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर यांचे लक्ष हे शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे, असा गंभीर आरोप राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांना कळत नाही, राऊत हे शिवसेनेमध्ये सुरुंग लावत आहेत, असेही राणे म्हणाले.

Sanjay raut- Narayan Rane
बापबेटे जेलमध्ये जाणार की नाही हे वेळ ठरवेल; पण सलिम-जावेद नक्की जाणार!

लोकप्रभेत असताना शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायचे सोडले नाही. संजय राऊत हे पत्रकार, संपादक नाहीत. संजय राऊत अस्वस्थ का झाला? घामाघूम झाला कशामुळे? प्रवीण राऊत यांनी ईडीला दिलेल्या माहितीमुळे राऊतांना घाम फुटला. अलिबागमधील फार्म हाऊससाठी पैसे कुठून आले? कोण प्रवीण पाटकर? तुझ्या मुली त्याच्या कंपनीत कशाला? . संजय राऊतांना आज मी ओळखत नाही. शरद पवार हे पहिल्यांदा जेव्हा उद्धव ठाकरेंना भेटायला गेले तेव्हा राऊत सोबत होते.

Sanjay raut- Narayan Rane
अखेर चरण वाघमारेंची तलवार मॅन, राजकीय भूकंप टळला…

पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते मंत्री येणार असे सांगितले होते, पण साधे विभाग प्रमुख सुद्धा आले नाही. पत्रकार परिषद शिवसेनेसाठी घेतली की स्वतःसाठी घेतली असा, सवाल राणे यांनी केला. कोणीच यांच्या परिषदेकडे फिरकले नाही, आणि यांनी काय शब्द वापरले. पेपरचे संपादकांना ही भाषा शोभते का असा सवालही राणे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com