MP Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Local Body Elections : राऊत यांच्या घोषणेनं शिवसैनिकांची धाकधूक वाढली? नागपुरात शिवसैनिक सैरभर

MP Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून मोठी घोषणा केली होती. त्यांनी चांदा ते बांदापर्यंतच्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला होता.

Rajesh Charpe

Nagpur News : मुंबई ते नागपूरपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. अशी घोषणाच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांनी ही घोषणा नागपूरमध्ये केली. ती करण्यापूर्वी त्यांनी नागपूरच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली नाही किंवा स्थानिक राजकीय परिस्थिती आणि पक्षाची ताकद किती हे जाणून घेतली नाही. यामुळे अनेक निष्ठावंत शिवसैनिक चिंतेत पडले आहे. कोणाला विचारायचे नाही, विश्वासात घ्यायचे नाही, बाहेरच्यांना मोठे करायचे, पदे द्यायची या अलीकडे आतापर्यंत काहीच झालेले नाही. या सिस्टिममुळे अनेकांची नाराजी सध्या नागपुरमध्ये दिसत आहे.

मागील महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक निवडूण आले होते. विद्यमान जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांचा यात समावेश आहे. ते सलग चार वेळा निवडणूक आले आहेत.

शिवसैनिक सैरभर झाले

भाजप-सेना युती असताना आधी पूर्व नागपूर आणि त्यानंतर दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला जात होता. ग्रामीणमध्ये दोन विधानसभा मतदारसंघात सेना लढत होती. मात्र यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर शहरातील एकमेव दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरचा हक्कही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने सोडला. त्यामुळे शिवसैनिक सैरभर झाले. विखुरले गेले आहेत. अशा परिस्थितीत कशाच्या भरोशावर स्वबळावर लढायचे असा प्रश्न आता शिवसैनिकांना पडला आहे.

नव्या सिस्टिमुळे निष्ठावंत नाराज

बाळासाहेब ठाकरे असताना संघटनेला सर्वाधिक महत्त्व दिले जात होते. कोणाला पक्षात घ्यायचे, कोणाला कुठले पद द्यायचे याची एक सिस्टिट होती. कुठल्याही जिल्ह्यात प्रवेश देताना संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुखाला विचारणा केली जात होती. आता मात्र थेट मुंबईतच प्रवेश होतात आणि पदे वाटप केली जात आहेत. जिल्हा प्रमुखाला याची माहितीसुद्धा नसते. या नव्या सिस्टिमुळे आधीच निष्ठावंत नाराज आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये संताप

अलीकडे तर पैसेवाल्यांना पदे देण्याची नवी सिस्टिम सुरू झाल्याने अनेकजण दुःखी आहेत. जनाधार नसलेल्यांना मोठमोठी पदे देण्यात आली. यापैकी अनेक जणांची महापालिकेची निवडणूकसुद्धा लढण्याची हिंमत नाही. ज्यांचा विदर्भाशी काही संबंध नाही आणि चार चार पक्ष सोडून आलेल्यांना विदर्भाचे समन्वयक करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे.

निष्ठावंत स्थान नाही

महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्व पदे बाहेरून आपलेल्या उपऱ्यांना वाटप करण्यात आली होती. एकाही निष्ठावंत सैनिकाला साधे दंडाधिकारीसुद्धा बनवण्यात आले नव्हते. विधानसभेच्या निवडणुकीत निष्ठावंत तसेच प्रामाणिक शिवसैनिक असलेल्या एकालाही उमेदवारी देण्यात आली नाही.

स्वबळाचा नारा कोणत्या भरोशावर

विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होताच सर्व उमेदवार गायब झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये अंसतोष पसरला आहे. अशा परिस्थिती ना चेहरा आहे आणि नाही नेतृत्व मग स्वबळाचा नारा कोणत्या भरोशावर देण्यात आला, असा सवाल अनेकांना सतावत आहे. तर निवडणूक लढायची कशी अशीही चिंता अनेकांना सतावत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT