Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी भाजपचा असा आहे मास्टर प्लॅन; कार्यकर्ते लागले कामाला

Maharashtra Local Body Election bjp master plan: विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना पुन्हा एकदा भाजपने संविधानाचा जागर करणाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली आहेत. भाजपने संविधान गौरव अभियान सुरू केला आहे.
Local Bodies Election
Local Bodies ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकी नंतर आता सर्वच राजकीय पक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोर्चे बांधणीला लागले आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष विधानसभेचा पराभव मागे टाकून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी करीत आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये केलेली विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत.

या दृष्टिकोनातून राजकीय पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी विविध मास्टर प्लॅन आखण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपने एक मोठा ऐतिहासिक विजय साकार केला.

त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत देखील असाच मोठा विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून भाजप कामाला लागली आहे. जी रणनीती विधानसभा निवडणुकीत आखण्यात आली होती त्याच पद्धतीचे रणनीती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आखण्यास सुरुवात केली आहे.

Local Bodies Election
Santosh Deshmukh Case: विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी CIDची दमछाक; सरपंच देशमुख हत्येच्या तपासासाठी...

लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी केंद्रामध्ये पुन्हा भाजपचा सरकार आल्यानंतर संविधान बदलणार असल्याचा प्रचार केला. याचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला.

लोकसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी ठेवून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधानाबाबत फेक नरेटीव पसरवला असल्याचे सांगत भाजपने संविधानाचा जागर केला. त्या रणनीतीचा फायदा देखील भाजपला विधानसभाच्या निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळालं.

Local Bodies Election
Beed Accident : बीड जिल्हा पुन्हा हादरला! आणखी एका सरपंचाचा मृत्यू; घात की अपघात?

आता विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना पुन्हा एकदा भाजपने संविधानाचा जागर करणाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली आहेत. भाजपने संविधान गौरव अभियान सुरू केला आहे.

संविधान गौरव अभियान प्रदेश समितीच्या महाराष्ट्र संयोजकपदी आमदार अमित गोरखे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह सहसंयोजक प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, सहसंयोजक शशीकांत कांबळे, सहसंयोजक प्रेरणा होनराव, सहसंयोजक अमित घुगे हे या टीममध्ये असतील.

Local Bodies Election
Delhi BJP Candidates List: आप अन् काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या 8 जणांना तिकीट; दिल्लीसाठी BJP ची दुसरी यादी जाहीर

अमित गोरखे म्हणाले, "राज्यभर 'संविधान गौरव अभियान' राबवणार आहोत. या अभियानात सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयात दौरे केले जाणार आहेत. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मूळ उद्देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचे महत्व जनमानसात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांना राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हाच आहे,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com