Sanjay Raut, sunil Tatkare  Sarakarnama
महाराष्ट्र

Sunil Tatkare News : संजय राऊतांच्या 'त्या' टीकेनंतर सुनील तटकरेंनी केला पलटवार; म्हणाले...

Political News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वेषांतर करूनच सरकार पाडले, अशी टीका केली होती. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी राऊत यांच्या टीकेचा समाचार घेत पलटवार केला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दिवसभर दिल्लीत होते. यावेळी दिल्लीतील काही पत्रकाराशी त्यांच्या गप्पा झाल्या. दादा त्यांच्या स्वभावाप्रमाणे जे काही बोलायचे होते ते बोलले. त्याचा सर्व तपशील वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे. त्यानंतर विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दहावेळा बैठका झाल्या. त्यावेळी मी तोंड लपवून व तोंडाला मास्क लावून दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत होतो, असे एका मुलाखती दरम्यान सांगितले. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वेषांतर करूनच सरकार पाडले, अशी टीका केली होती. त्यानंतर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राऊत यांच्या टीकेचा समाचार घेत पलटवार केला आहे. (Sunil Tatkare News)

2019 ची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते. या निवडणुकीत युतीला कौल दिला होता. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) हे शरद पवार आणि काँग्रेसचे दरवाजे झिजवत होते. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन केली.

त्यावेळी राज्यातील जनतेचा कौल हा युतीला असून तुम्ही छुप्प्या भेटी घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्याला काय नाव देणार ? असा सवाल यावेळी सुनील तटकरे यांनी करीत राऊत यांच्यावर पलटवार केला.

ऑगस्टपासून काढणार जनसन्मान यात्रा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर आता अजितदादा जनसन्मान यात्रा आम्ही ऑगस्टपासून सुरू करत आहोत. त्याची सुरुवात नाशिकमधून करत आहोत.

सर्व घटकांशी अजितदादांचा थेटपणे संवाद होणार आहे. माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजना, थकीत बिल माफ होऊन बारा तास वीज शेतकऱ्यांना मोफत मिळणार अशा अनेक योजना राबवल्या जाणार असल्याचे तटकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT