Ajit Pawar News : महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचे मोठं विधान; म्हणाले,...

Political News : महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. जागा वाटपाबाबत महायुतीमधील घटक पक्षात कुठलाही मतभेद नाहीत, निवडून येण्याची क्षमता बघून या सर्व गोष्टींचा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar, NCP
Ajit Pawar, NCPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी नुकतीच महायुतीमधील घटक पक्षाची बैठक पार पडली.

महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. जागा वाटपाबाबत महायुतीमधील घटक पक्षात कुठलाही मतभेद नाहीत, निवडून येण्याची क्षमता बघून या सर्व गोष्टींचा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar News)

त्यासोबतच येत्या काळात जागावाटपाची चर्चा सुरु करण्यात येणार आहे. महायुतीमध्ये आम्ही सन्मानजनक जागा लढणार आहोत. जागावाटपासाठी लवकरच आम्ही एक समन्वय समिती नेमत आहोत. राज्यात एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागावाटपाच्या संदर्भात सुद्धा दोन दिवसात चर्चा होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट करीत जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.

जागावाटपात महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावर महायुतीमधील महत्त्वाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत दुजोरा दिला आहे. तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यामध्ये जागावाटपासाठी आम्ही लवकरच एक समन्वय समिती नेमत आहोत, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले.

Ajit Pawar, NCP
Narhari Jirwal : नरहरी झिरवाळ कोणाकडे? उद्याच्या दिंडोरीतील सभेत समजणार

राज्यात एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा दोन दिवसात चर्चा होईल. चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भात तपशील देऊ. माझ्या माहितीनुसार, जागा वाटपाच्या संदर्भात कुठलेही अडचण नाही. आम्ही निवडून येण्याची क्षमता बघून या सर्व गोष्टींचा निर्णय घेणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

येत्या काळात स्वबळावर निर्णय घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात राहू शकते. महायुतीत अधिक जास्त प्रमाण आहे. महाविकास आघाडीत आहेच, पण महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त आहे. प्रत्येकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. क्रांतिकारी योजनांमुळे आपल्याला विधानसभेत जाण्याची संधी वाटत आहे, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, NCP
Ajit Pawar politics: अजित पवारही जागे झाले, विधानसभेच्या तयारीसाठी काढली सन्मान यात्रा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com