Suresh Dhas Sarkarnama
महाराष्ट्र

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्याप्रकरणात आमदार सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले,'महिलेची छेड...'

Santosh Deshmukh Murder Case : सुरेश धस म्हणाले, सुदर्शन घुलेची मी माहिती घेतली आहे. सहा पत्र्याचं त्याच घर आहे. घुलेचे सहा पत्र्याचं घर आहे. स्कॉर्पियो घेऊन तो फिरतोय त्याला स्काँर्पिओ कुणी दिलेली आहे. ती त्याच्यानावावर आहे का?

Roshan More

Beed News : संतोष देशमुख हत्याप्रकरणात आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत महिलांची छेड काढली म्हणून संतोष देशमुखला माराहाण करायचा प्लान होता, असा आरोप केला. संतोष देशमुखवर आरोप करण्यास कळंब येथे एक महिला देखील तयार होती. त्या महिलेची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील धस यांनी केली.

पीएसआय भोसले आणि सुदर्शन घुले संपुर्ण शहरात फिरत होते. महाजन यांच्या सोबत घुले फिरत होते. सुदर्शन घुले याला लगेच सोडण्यात आले. हॉटेलात सुदर्शन घुले आणि पीएसआय भोसले चहा पिताना दिसत आहेत. बीडचं आपण मिटवू असं सीसीटीव्हीत दिसत आहे,असे देखील धस यांनी विधानसभेत सांगितले.

सुरेश धस म्हणाले, सुदर्शन घुलेची मी माहिती घेतली आहे. सहा पत्र्याचं त्याच घर आहे.सुदर्शन घुलेचे सहा पत्र्याचं घर आहे. स्कॉर्पियो घेऊन तो फिरतोय त्याला स्काँर्पिओ कुणी दिलेली आहे. ती त्याच्यानावावर आहे का? सोनपेठवरून वाळूच्या गाड्या चालतात. तीनशे तीनशे गाड्या चालत असतात. दररोज कोटी रूपये गोळा केल्याशिवाय राहत नाही. या कंपन्यांना कोण बोलवून घेतं असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे.

'आका'ला व्हिडिओ काॅल केला...

संतोष देशमुखचे डोळे लायटरने जाळण्यात आले. पाणी मागितलं तेव्हा दुसरं काहीतरी दिलं. या प्रकरणात अधिकारी दोषी आढळला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी. संतोष देशमुख याला मारहाण करत असताना 'आका'ला व्हिडिओ काॅल करून कशी मारहाण करण्यात येत आहे हे दाखवण्यात आले. तो आका कोण याची चौकशी केली जावी, अशी मागणी धस यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT