AAP News : मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने दाखल केला मानहानी दावा, 'आप'च्या नेत्यांनी सांगितले दिल्ली कनेक्शन

Sulakshana Sawant sanjay singh AAP : फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीत संजय सिंह हे आपचे स्टार प्रचारक असतील.
MP Sanjay Singh
MP Sanjay SinghSarkarnama
Published on
Updated on

AAP News : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीवर 'कॅश फॉर जॉब' प्रकरणात आरोप करणे आपचे नेते, खासदार संजय सिंह यांना भोवण्याची शक्यता आहे. CM प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी संजय सिंह यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या मागे मोठा कट असल्याचा दावा गोव्यातील आप नेत्यांनी केला आहे.

गोवा आपचे महासचिव वाल्मिक नाईक यांच्यासह इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीने संजय सिंह यांच्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला म्हणजे त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्याचा कट आहे, असे नाईक म्हणाले.

MP Sanjay Singh
Bjp News : आशिष शेलारांनंतर भाजपने दिली मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी 'या' नेत्यावर

फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीत संजय सिंह हे आपचे स्टार प्रचारक असतील. मात्र, सिंह यांना न्यायालयीन सुनावणीसाठी गोव्यात यावे लागेल, या केसमुळे वेळ वाया जाईल आणि ते निवडणूक प्रचारावर लक्ष केंद्रीत करू शकणार नाहीत, यासाठी मानहानीचा खटला दाखल केल्याचा आरोप नाईक यांनी केला.

कोठडीतून फरार सिद्दीकी उर्फ सुलेमान खान या प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी देखील हा खटाटोप केला असावा, असे नाईक म्हणाले. गोवा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी मंगळवारी (17 डिसेंबर) उत्तर गोव्यातील डिचोली गावातील न्यायालयात संजय सिंह यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. सिंह यांनी नोकरी घोटाळ्यात आपले नाव घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. या अंतर्गत त्यांनी आप नेत्याकडे 100 कोटी रुपयांची भरपाई मागितलीय. न्यायालयाने याप्रकरणी सिंह यांना नोटीस बजावली असून, 10 जानेवारी 2025 पर्यंत उत्तर मागितले आहे.

MP Sanjay Singh
Parbhani Violence News : परभणी दंगल प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com