Beed News: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणाशी संबधीत अटकेत असलेला वाल्मिक कराड याला आज केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराड हा सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या कोठडीत आहे.
त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या कोठडीत वाढ होणार की नाही, हे दुपारी समजेल. वाल्मिकला आज न्यायालयात आणणार असल्यामुळे केज न्यायालय परिसरात बंदोबस्त वाढण्यात आला आहे.
देशमुख हत्या प्रकरणाशी संबधीत खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा आरोपी आहे. या प्रकऱणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा शोध सुरु आहे.
वाल्मिक कराड वगळता आठही आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिकलाही मोक्का लावा, अशी मागणी मयत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सोमवारी दिली. सीआयटीतील काही अधिकारी कराड याच्या संपर्कात असल्याचा आरोप होता.
या प्रकरणाचे वकीलपत्र उज्ज्वल निकम यांनी घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांना फोन केला होता, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.
देशमुख हत्या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन केल्याबाबत अंजली दमानिया यांनी सरकारचे आभार मानले आहे. वाल्मिक कराडला मोक्का लावा,अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. मस्साजोग येथील ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली, ते आज एसआयटीचे अधिकारी बसवराज तेली यांची भेट घेणार आहेत.
वाल्मिक कराड याने गैरमार्गाने कमावलेला पैसा पुण्यात रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याची माहिती समोर येत आहे. बीड पोलिसांच्या तपासावर खासदार बजरंग सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.