
Beed News: सीआयडीनं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाला वेग दिला आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा जवाब केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नोंदवला आहे. यात अश्विनी देशमुख यांनी खळबळजनक माहिती सीआयडीला सांगितली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी नोव्हेंबर महिन्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती, त्यामुळे महिनाभरापासून ते अस्वस्थ होते, असा जवाब अश्विनी देशमुख यांनी सीआयडी पथकाकडे नोंदवला आहे. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनी ही धमकी दिल्याची धक्कादायक माहिती अश्विनी देशमुख यांनी दिली.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याला मोक्का लावा, फरार आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करा, या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांनी फोन करून पाण्याच्या टाकीवरून खाली येण्याची विनंती केली आहे. पण धनंजय देशमुख हे टाकीवर आंदोलन करीत आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याचे ते टाकीवर झोपले आहेत.
धनंजय देशमुख यांच्यासह पाण्याच्या टाकीवर तीन जणांची आंदोलन सुरु केली आहे. मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत, धनंजय देशमुख त्यांचे साडू दादा खिंडकर व अन्य एक जण पाण्याच्या टाकीवर चढले आहेत.
'वाल्याला फाशी झालीच पाहिजे,' अशा घोषणा महिला देत आहेत. पाण्याच्या टाकीला पोलिसांनी वेढा घातला आहे. ग्रामस्थांनी परिसरात गर्दी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.