Dhananjay Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे, आता राजीनामा देण्याची तयारी करा! शिर्डीतल्या विधानानंतर दमानियांचा पहिला वार

Anjali Damania Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad : धनंजय मुंडे यांनी रविवारी शिर्डीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीराला हजेरी लावली.

Rajanand More

Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. त्याच्या केंद्रस्थानी मंत्री धनंजय मुंडे आहेत. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकला जात आहे. आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना आता राजीनामा देण्याची तयारी करा, असा निर्वाणीचा इशारा दिला.

मुंडे यांनी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात बोलताना बीडच्या मातीला बदनाम करू नका, असे विधान विरोधकांना उद्देशून केले. त्यानंतर दमानिया यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत मुंडेंवर पलटवार केला आहे. धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडनी केली, सुदर्शन घुलेनी केली, विष्णू चाटेनी केली, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दमानिया यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीडबद्दल काय म्हणाली वाचा, असे सांगत दमानिया यांनी काही नेत्यांची विधानेही दिली आहेत.  

“राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतं  आहे. याप्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा. आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्ष हिताचं नाही,” असे नेत्यांनी म्हटल्याचा दावा दमानियांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा, असे लिहित मुंडेंना पुन्हा डिवचले आहे.

काय म्हटले होते धनंजय मुंडे?

'विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा. मला आत्ता यावर काही बोलायचं नाही. वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही. आत्ताची परिस्थिती पाहता बीडमध्ये सामाजिक सलोखा व्यवस्थित व्हायला हवा. मला बदनाम करायचंय, तर करा. मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका", अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT