Santosh Deshmukh Murder Case Sarkarnama
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: मोठी बातमी: होय, आम्हीच देशमुखांची हत्या केली ! मास्टरमाईंडसह तीन आरोपींची कबुली

Santosh Deshmukh Murder Case: सुदर्शन घुले , जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Mangesh Mahale

Beed News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंडसह तीन आरोपींनी गु्न्ह्यांची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. मास्टरमाईंड सुदर्शन घुलेने देशमुख यांच्या हत्येची कबुली दिली आहे.

सुदर्शन घुले , जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. होय आम्हीच देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या केली, अशी कबुली घुले याने दिली आहे.

खंडणीचा व्हिडीओ दाखवल्यानंतर घुले पोपटासारखा बोलायला लागला.'होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला', अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारच्या सुनावणीत युक्तीवाद केला. आरोपींच्या वकीलांना आवश्यक असलेले कागदपत्रे देण्यात आले. निकम यांनी या हत्येचा पुरावा न्यायालयात मांडला.

या खटल्यातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांनी 'आका' वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना तीन वेळा फोन केल्याचे तपासात उघड झाल्याने निकम यांनी सांगितले. याबाबतचा कृष्णा आंधळे यांचा सीडीआरचा अहवाल त्यांनी कोर्टात सादर केला.

चौकशीत घुले याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "संतोष देशमुख याने आम्हाला आवादा कंपनीच्या आवारात मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. त्या मारहाणीचे व्हिडीओ देशमुख याने सोशल मीडियावर व्हायरल करुन आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनात होता. आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात तो अडथळा येत होता, म्हणून आम्ही त्याची हत्या केली, असे घुले म्हणाला.

वाल्मिक कराडनं अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंकडे दोन कोटींची खंडणी मागितली, यासंदर्भातले टॉवर लोकेशन आणि सीडीआर आहेत, अशी माहिती उज्ज्वल निकमांनी कोर्टात दिली.

26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले हा अवादा कंपनीत गेला आणि कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करण्याची धमकी दिली, 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरुन अवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदेंना फोन केला. त्यानंतर घुलेनं सांगितलं त्याप्रमाणे काम अथवा काम बंद करा, अशी धमकी दिली सुनील शिंदेंचा फोन स्पीकरवर होता, वाल्मिक कराडची धमकी शिवाजी थोपटेंनी देखील ऐकली, असे निकम यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी ही 10 एप्रिल होणार असून न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT