Sarathi Pune sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation: 'हैदराबाद गॅझेट'ची अंमलबजावणी सुरु असतानाच मराठा समाजातील 70 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

Sarathi Scholarship Cancelled 70k Maratha Students Affected: २०२२ मध्ये 'छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना' सुरू करण्यात आली. मराठा समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे आणि त्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

📌 Summary

  1. राज्य सरकारने सारथी संस्थेची छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० हजार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.

  3. पालक, विद्यार्थी आणि मराठा क्रांती मोर्चाने या निर्णयाविरोधात असंतोष व्यक्त केला आहे.

Pune news: मराठा आरक्षणाचा विषय गाजत असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असलेल्या सारथी संस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. सारथी कडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती बंद केल्याने या विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे. एकीकडे मराठा समाजासाठी 'हैदराबाद गॅझेट' लागू करून दुसरीकडे मराठा समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली जात आहे.

'छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्थे'तर्फे (सारथी) २०२२ मध्ये 'छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना' सुरू करण्यात आली. मराठा समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे आणि त्यांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली. आता ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात पुण्यातील सुमारे सात हजार ५०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय, अमृत आणि तत्सम संस्थांसाठी सर्वकष धोरण तयार करताना, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीत छत्रपती राजाराम महाराज सारधी शिष्यवृत्ती योजना' बंद करण्याचा निर्णय घेतला, सारथी मध्ये सुरू असलेली योजना बार्टी' आणि 'महाज्येती संस्थांमध्ये सुरू नसल्याचा दाखला देत, हा निर्णय घेण्यात आला. शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे शिक्षणाची संधी हिरावली जाण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त आज 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती बंद झाल्याने अनेक विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. माझे आई-वडील शेतीत काम करून घर चालवतात. त्यांना माझ्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने माझे शिक्षण बंद होणार होते. ही शिष्यवृत्ती मिळाल्याने मला पुढे शिकता येत होते. आता हो योजना बंद झाली, तर आमच्यासारख्या मुल्यांचे शिक्षण थांबेल की काय, अशी भीती वाटते, असे एका मुलाने नाव न प्रसिद्ध केल्याच्या अटीवर सांगितले.

मराठा समाजातील साडेतीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली ही महत्वाची शिष्यवृत्ती बंद झाल्याने समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. महायुती सरकार मराठा समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे पुणे समन्वयक सचिन आडेकर यांनी सांगितले.

शाळेत जायचे. शिकायचे आणि पुढे काहीतरी मोठे करायचे हे स्वप्न होते. शिष्यवृत्तीमुळे ते शक्य होते. आता ती योजना बंद झाली. तर आमच्यासारख्या हजारो विद्याथ्यचि भवितव्य अंधारात गेले आहे. शिक्षणाची दारे बंद झाली. तर आम्हाला कोण आधार देणार? असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने उपस्थित केला.

 FAQ

Q1. सारथी शिष्यवृत्ती योजना कधी सुरू करण्यात आली होती?
सन २०२२ मध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली.

Q2. ही शिष्यवृत्ती कोणत्या विद्यार्थ्यांसाठी होती?
साडेतीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी.

Q3. सरकारने योजना बंद करण्याचे कारण काय दिले?
बार्टी आणि महाज्योती संस्थांमध्ये अशी योजना नसल्याचे कारण दाखवून निर्णय घेण्यात आला.

Q4. शिष्यवृत्ती बंद झाल्याने किती विद्यार्थी प्रभावित होतील?
सुमारे ७० हजार विद्यार्थी शिक्षण थांबण्याच्या भीतीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT