Gram Panchayat  Sarkarnama
महाराष्ट्र

Sarpanch Salary : सरपंच, उपसरपंचाच्या बँक खात्यात ठणठणाट, वाढीव मानधनाची प्रतीक्षा

Sarpanch and Deputy Sarpanch Increased Honorarium :सरकारने मानधनाविषयी घेतलेल्या निर्णयानुसार 2 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायचीच्या सरपंचाचे मानधन 3 हजारावरून सहा हजार रुपये करण्यात आले

Roshan More

Sarpanch Salary : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने: निर्णयांचा सपाटा लावला होता. त्यामध्ये सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनवाढीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. त्यासंदर्भात जीआर देखील निघाला. या मानधन वाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार येण्याची शक्यता होती.

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले मात्र सरपंच, उपसरपंच यांना वाढीव मानधन अजून मिळाले नसल्याने त्यांच्या बँक खात्यात ठणठणाट आहे. मानधन कधी मिळणार याची देखील स्पष्टता करण्यात आली नाही.

सरकारने मानधनाविषयी घेतलेल्या निर्णयानुसार 2 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायचीच्या सरपंचाचे मानधन 3 हजारावरून सहा हजार रुपये करण्यात आले तर त्या ग्रामपंचायतीच्या उपसरंपचाचे मानधन 1 हजारावरून वरुन 2 हजार रुपये करण्यात आले.

ज्या ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2 हजार ते 8 हजारा पर्यंत आहे तेथील सरपंचाचे मानधन 8 हजार तर उपसरपंचाचे मानधन हे तीन हजार रुपये करण्यात आले आहे. सरकारकडून मानधनात तब्बल दुप्पट वाढ करण्यात आली होती.

8 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सरपंचाचे मानधन पाच हजार रुपयावरून 10 हजार रुपये करण्यात आले तर उपसरपंचाचे मानधन चार हजार रुपये करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT