Delhi Vidhan Sabha Election : दिल्लीत सरकार निवडण्यात महिला मतदारांची भूमिका कायमच ठरली निर्णायक!

Delhi Election and Women Voting : जाणून घ्या, मागील निवडणुकांमधील मतदानांची आकडेवारी?
Delhi Women Voters
Delhi Women VotersSarkarnama
Published on
Updated on

Delhi Vidhan Sabha Election 2025 : राजधानी दिल्लीत जेव्हा जेव्हा सरकार निवडण्याची वेळ येते. तेव्हा तेव्हा महिला सर्वात पुढे असतात. निवडणूक आयोगही नारी शक्तिला प्रोत्साहन देण्यासाठी पिंक बूथ सारखे उपक्रम राबवत असतो. दिल्ली विधानसभेच्या राजकारणात मागील 22 वर्षांच्या रेकॉर्डवर टाकली तर राजधानीत महिलांची मतदानाची टक्केवारी ही पुरुषांपेक्षा जास्त दिसून आली आहे.

वर्ष 1998 ते 2020 पर्यंत राजधानी दिल्लीत सहावेळा विधानसभा निवडणूक झाली आहे. प्रत्येकवेळी मागील निवडणुकीच्या तुलनेत पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभगा जास्त राहिला आहे. वर्ष 1998 ते 2015 महिलांच्या मतांच्या टक्केवारीत 20.08 टक्के आणि पुरुषांच्या मतांच्या टक्केवारीत 16.74 टक्के वाढ झाली आहे. खरंतर वर्ष 2020 मध्ये पुरुषांनी 62.62 टक्के आणि महिलांनी 62.55 टक्के मतदान केलं होतं.

Delhi Women Voters
Congress MP Arrested : मोठी बातमी! काँग्रेस खासदाराला पोलिसांनी भर पत्रकारपरिषदेतून केली अटक ; बलात्काराचा आहे आरोप

निवडणूक आयोगाचे(Election Commission) आकडे सांगतात की, 2008च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त 81 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यानंतर 2013 आणि 2015च्या निवडणुकीत महिला उमेदवारांच्या संख्येत कमी दिसून आली होती. 1993 मध्ये 59, 1998 मध्ये 57, 2003 मध्ये 78, 2008 मध्ये 81, 2013 मध्ये 71 आणि 2015 मध्ये 66 आणि 2020 मध्ये 79 महिलांनी निवडणूक लढवली होती.

वर्ष 1998मध्ये जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तेव्हा महिलांची मतादानाची टक्केवारी 46.41 टक्के होती. वर्ष 2015च्या विधानसभा निवडणुकीत 20.08 टक्के वाढीसह हे प्रमाण 66.49 टक्के होते. तर पुरुषांबाबत बोलायचे झाले तर हे प्रमाण 50.89 टक्क्यांवरून वाढून 67.63 टक्क्यांवर पोहचले. म्हणजेच पुरुषांच्या मतदान टक्केवारीत 16.74 टक्के वाढ झाली आहे.

Delhi Women Voters
Kolhapur Local Election : उधार-उसनवारी करून राजकारण करण्याची वेळ? ; कार्यकर्ते सांभाळत समाजकारणामुळे इच्छुकांचे खिसे होताय रिकामे!

वर्ष 1993मध्ये जेव्हा दिल्लीला मदनलाल खुराना यांच्या रूपात भाजपचे(BJP) पहिले मुख्यमंत्री लाभले. त्यावेळी मोठ्याप्रमाणात मतदान झाले होते. त्या निवडणुकीत 61.75 टक्के मतदान झाले होते. ज्यामध्ये पुरुषांचे मतदान टक्केवारी 64.56 टक्के आणि महिलांची मतदान टक्केवारी 58.27 टक्के होती. यानंतर वर्ष 1998मध्ये मतदान टक्केवारी 12.76 टक्के कमी झाले. खरंतर यानंतर दिल्लीत मतदानाची पातळी प्रत्येक निवडणुकीत वाढत आहे.

यंदा विधानसभा निवडणुकीत(Vidhan Sabha Election) महिला उमेदवारांची संख्या आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. यंदा 96 महिला विविध विधानसभा मतदारसंघातून आपली दावेदारी सांगत आहेत. 96 महिला उमेदवार असूनही 70 पैकी 21 विधानसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे एकही महिला उमेदवार नाही.

Delhi Women Voters
Arvind Kejriwal : निवडणूक आयोगाच्या नोटीसला केजरीवाल यांचे उत्तर, म्हणाले...

यंदा विधानसभा निवडणुकीत 2013च्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2013मध्ये 810 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये 739 पुरुष आणि 71 महिला उमेदवार सहभागी होत्या. यानंतर झालेल्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या कमी होत गेली. 2015च्या निवडणुकीत 673 उमेदवार होते. यामध्ये 606 पुरुष आणि 66 महिला उमेदवार होत्या. 2020च्या निवडणुकीत एकूण 672 उमेदवारांनी शड्डू ठोकले. ज्यामध्ये पुरुष उमेदवार 593 होते, तर 79 महिला उमेदवार होत्या. यंदा 699 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com