Satej Patil Amit Deshmukh vishwajeet kadam sarkarnama
महाराष्ट्र

Congress Politics : प्रदेशाध्यक्षपदाचा चकवा पण काँग्रेसने सतेज पाटील, अमित देशमुखांना दिली मोठी जबाबदारी! विधिमंडळ पक्षाचे...

Satej Patil Appointed Congress Legislative Council :अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Roshan More

Congress Politics News : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे चर्चेत होती. मात्र, काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपद देत सर्वांनाच धक्का दिला. प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीनंतर काँग्रेस विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदाची जबाबादारी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, मुख्य प्रतोद म्हणून अभिजित वंजारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

खर्गे यांनी जाहीर केलेल्या जबाबादाऱ्यांमध्ये लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्यावर विधानसभेत काँग्रेसने मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी दिली आहे. तर, काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या सचिवपदी विश्वजित कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेत उपनेतेपदी अमीन पटेल, प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक, संजय मेश्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

विजय वडेट्टीवार विधीमंडळ नेते

हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. नाना पटोले हे या पदासाठी इच्छुक होते मात्र त्यांच्या ऐवजी पक्षाने विजय वडेट्टीवार यांना नियुक्ती केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT